पाच चा पंच : ते ’पांडव’ ज्यांनी मुंबईला जिंकून दिले ’IPL चे महाभारत’

दुबई : यूएईमध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या 13व्या सीझनच्या विजेत्या संघाची घोषणा झाली आहे. दुबईत खेळल्या गेलेल्या फायनल मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवून मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा हा किताब पटकावला. टूर्नामेंटचा पहिला सामना हरल्यानंतर मुंबईने जबरदस्त सुरूवात केली आणि शेवटपर्यंत सातत्य दाखवत आघाडीवर राहात ट्रॉफीपर्यंतचा प्रवास पार केला. अशावेळी जाणून घेवूयात त्या पाच खेळाडूंबाबत ज्यांनी मुंबईला पाचव्यांचा चॅम्पियन बनवण्यात मुख्य भूमिका निभावली.

1 जसप्रीत बुमराह :
जसप्रीत बुमराहने यावेळी पुन्हा आपल्या गोलंदाजीने मुंबईला विजय मिळवून दिला. बुमराहने आपल्या गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना प्रचंड त्रस्त करून सोडले. त्याने 15 सामन्यात 15 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्या.

2 ट्रेंट बोल्ट :
दिल्लीतून मुंबईत आलेल्या बोल्टने यावेळी मुंबईसाठी पावरप्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजीसह डेथ ओव्हर्समध्ये सुद्धा फलंदाजांना त्रस्त केले. बोल्टने सीझनमध्ये 15 मॅचमध्ये 25 विकेट घेतल्या.

3 ईशान किशन :
ईशान किशनला सुरूवातील संधी मिळाली नाही, पण नंतर मिळालेला संधीचे त्याने सोने केले. ईशानने सीझनमध्ये अनेक षटकार मारत भरपूर धावा केल्या. अनेक सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. त्याने सर्वाधिक धावा केल्या. 14 मॅचमध्ये 57 च्या सरासरीने आणि 145 च्या स्ट्राइक रेटने 516 धावा केल्या. तसेच चार अर्धशतके केली.

4 क्विंटन डिकॉक :
विकेटकीपर फलंदाज डिकॉक सुरूवातील संघर्ष करताना दिसला, परंतु नंतर त्याने अनेक मॅचमध्ये विजयी खेळी केली. या सिझनमध्ये त्याने 16 मॅचमध्ये 36 च्या सरासरीने आणि 140 च्या स्ट्राइक रेटने 503 धावा केल्या. चार अर्धशतकं केली. विकेटच्या पाठीमागेसुद्धा चांगली कामगिरी केली. त्याने 18 कॅच आणि चार स्टंपिंग केल्या.

5 सूर्यकुमार यादव :
मागच्या सीझनमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या सूर्यकुमार यादवने या सीझनमध्ये नेत्रदिपक कामगिरी केली. त्याने मुंबईला अनेक वेळा सांभाळले आणि विजयी खेळी केली. सूर्यकुमारने या सीझनमध्ये 16 मॅचमध्ये 40 च्या सरासरीने आणि 145 च्या स्ट्राइक रेटने 480 धावा केल्या आणि चार अर्धशतकं केली.