Five State Assembly Election-2022 | उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सर्व तारखा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Five State Assembly Election-2022 | मागील काही दिवसांपासून पाच राज्यातील निवडणुकांविषयी जोरदार चर्चा सुरू होत्या. पाचही राज्याच्या निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागून होते. मात्र आज (शनिवारी) निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पाचही राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा (Five State Assembly Election-2022) जाहीर केल्या आहेत. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Election Commissioner Sushil Chandra) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे आता गोवा (Goa), मणिपुर (Manipur), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुका पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मागील काही काळात कोरोनाचे संकट (Coronavirus) वाढल्याने निवडणुका लांबणीवर टाळण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने 5 राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पाचही राज्यातील निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे निवडणुक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या तरी या निवडणूका कोरोनाचे नियम पाळून पार पडल्या जाव्यात असं सांगण्यात आलं आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलींना 15 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. रोड शो आणि बाईक शोवर देखील बंदी घालण्यात आले असल्याचं आयोगाने सांगितलं आहे. (Five State Assembly Election-2022)

दरम्यान, 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राची संख्या 16 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. यंदा मतदान केंद्राची संख्या दोन लाख 15 हजार 368 आहे. ‘यकीन हो तो कोई रास्ता निकलता है हवा की ओट की ख़िलाफ़ भी दिया जलता है,’ कोरोना महामारी से निकलेंगे हमे यकीन है! या शायरीच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वा आव्हांनाचा सामना करत निवडणुका घेतल्या जातील अशा शब्दात स्पष्टीकरण दिलं आहे.

पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा –

उत्तर प्रदेश – 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी (7 टप्प्यात मतदान)

मणिपूर – 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान होणार (2 टप्पा)

पंजाब, – 14 फेब्रुवारी

उत्तराखंड – 14 फेब्रुवारी

गोवा – 14 फेब्रुवारी

पाचही राज्याची मतमोजणी – 10 मार्च 2022

Web Title : Five State Assembly Election-2022 | assembly election 2022 live updates uttar pradesh punjab goa manipur uttarakhand bjp congress pm security breach reactions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय