अर्थव्यवस्थेला चालणा देण्यासाठी ‘ही’ 5 राज्य देशाला देणार मदतीचा हात, मात्र, महाराष्ट्राच स्थान काय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घेण्यात आला. आता देश हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर पडू लागला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं मोदी सरकारनं अनलॉकची घोषणा केली आहे. यामध्ये पाच राज्यं देशासाठी मोठी कामगिरी पार पाडणार आहेत. सध्या या राज्यांचं देशाच्या जीडीपीमधलं योगदान 27 टक्के आहे. हीच पाच राज्यं आता देशाला मदतीचा हात देईल असं इलारा सिक्युरिटीजनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

केरळ, पंजाब, तामिळनाडू, हरयाणा आणि कर्नाटक राज्यांची भूमिका येत्या काही दिवसांत अतिशय महत्त्वाची असेल. या राज्यांमधील उर्जेचा वापर, वाहतूक, शेतमाल बाजारांत येण्याचं प्रमाण वाढल्याचं इलारा सिक्युरिटीच्या अर्थतज्ज्ञ गरिमा कपूर यांनी म्हटलं आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्र आणि गुजरात ही सर्वाधिक औद्योगिकरण झालेली राज्यं मागे आहेत. या राज्यांमधील कोरोना बाधितांचा आकडा जास्त असल्याने ही राज्यं पिछाडीवर पडल्याचं विश्लेषण कपूर यांनी केले आहे.

मोदी सरकारने देशातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवणार आहे. त्याची सुरुवात 8 जूनपासून होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागांमधील शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळ सुरु होतील. अर्थचक्राला चालना देणं हीच भारतीय उद्योगांच्या दृष्टीनं सर्वात मोठी आर्थिक मदत असू शकते, असं इलारा सिक्युरिटीजनं म्हटलं आहे. पंजाब, हरयाणाच्या विजेचा वापर वाढला आहे. त्यातून मागणी वाढल्याचं अधोरेखित होत असल्यांच नमूद करण्यात आलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like