हृदयविकाराचा झटका आल्यास ‘या’ पाच गोष्टी करा ; वाचू शकतो जीव

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकार सध्या सर्वच वयोगटात दिसून येतो. खाण्या-पिण्याच्या सवयी, वाढणारे कॉलेस्ट्रोल आणि व्यायामाचा आभाव यामुळे हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर करावे हे आजूबाजूच्या व्यक्तींना सूचत नाही. जर कुणाला हृदयविकाराचा झटका आला तर घाबरून न जाता पाच मिनिटांच्या आत हे पाच उपाय केल्यास त्या रुग्णाचा जीव वाचू शकतो.

* रुग्णाच्या मानेच्या बाजूने हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर पल्स ६०-७० पेक्षा कमी असेल तर रक्तदाब गतीने वाढत आहे असे समजावे. रुग्णाची तब्येत नाजूक असल्याने त्यास तातडीने दवाखान्यात न्यावे.

* हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला उलटी आल्यासारखी वाटते. रुग्णाला एका बाजूने वळवून उलटी करू द्यावी. त्यामुळे फुप्फुसांचे नुकसान होणार नाही.

* रुग्णाला सरळ झोपवा आणि त्याचे कपडे सैल करा. यामुळे त्याची बेचैनी थोडी कमी होईल.

* रुग्णाला गराडा घालू नये. त्याच्या आजूबाजूला वारा येण्यासाठी जागा सोडावी. यामुळे त्यास पुरेसा ऑक्सिजन मिळेल. शक्य तेवढ्या लवकर रूग्णाला मेडिकल अटेन्शन मिळवून द्यावी.

* पल्स रेट जर कमी-जास्त होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याच्या पायाला वर उचला. यामुळे पायाचा रक्तप्रवाह हृदयाच्या बाजूने सुरू होईल आणि रुग्णाला आराम मिळेल.