home page top 1

‘या’ शाळकरी मुलींचे स्टंट पाहून 5 वेळा ऑलम्पिक ‘गोल्ड मेडल’ मिळवणारी झाली ‘हैराण-परेशान’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या दोन मुलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन शालेय मुले मोठ्या सहजतेने जिम्नॅस्टिक्स मूव्हज करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर गेलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो पाच वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी रोमानियाची जिमनास्ट नाडिया कोमेंसी यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

जिम्नॅस्ट नादिया कोमॅन्सीने हे व्हिडिओ तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले असून या मुलांचे कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये, मुलांच्या या जोडीने चमकदार समरसॉल्ट आणि कार्टव्हीलची कौशल्य दाखवली आहेत. नादिया तिच्या परिपूर्णतेसाठी ओळखली जाते. अनईवन पैरलल बार्समध्ये त्याने 10.0 गुण मिळवले.

तसेच, या दोन शालेय मुलांचा हा पराक्रम क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच लक्षात घेतला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते आणि म्हटले होते की, ही मुले प्रतिभाशाली आहेत. जर कोणी या मुलांना माझ्याकडं आणत असेल तर मी त्यांना जिम्नॅस्टिक्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण देऊ शकेल, असे क्रीडामंत्री म्हणाले होते.

ही शालेय मुले कोणत्या भागातील आहेत. हे अद्याप माहित झाले नसले तरी या व्हिडिओवरील कमेंटनुसार तो नागालँडचा व्हिडिओ आहे. शालेय मुलांच्या या कलेमुळे केवळ ऑलिम्पिकच नाही तर जगभरातील लोकही या मुलांचे फॅन बनले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like