तत्कालीन नंबर 1 आणि 5 वेळा ‘ग्रॅन्डस्लॅम’ चॅम्पियन राहिलेल्या मारिया शारापोवानं टेनिसला ठोकला ‘रामराम’, घेतली ‘निवृत्ती’
नवी दिल्ली, वृत्तसंस्था – रशियाची स्टार टेनिस पटू मारिया शारापोवा हीने 32 वर्षी टेनिसमधून संन्यास घेतला आहे. पाचवेळा ग्रॅंडस्लॅम चॅंपियन शारापोवा हीने बुधवारी टेनिसला रामराम ठोकला आहे. 4 वर्षाच्या वयात वडीलांसह टेनिसमध्ये करिअर करण्यास सुरुवात करणाऱ्या शारापोवा मागील काही काळापासून फॉर्म टिकवण्यासाठी झुंज देत होती. 2012 साली लंडन ओलंपिकमध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या शारापोवा हिने करिअरची सुरुवात केली होती. तिने सलग एका पाठोपाठ एक टूर्नामेंट आपल्या नावे केले होते.
शारापोवा यांनी 2004 साली विंबलडनमध्ये पहिला ग्रॅंडस्लॅम आपल्या नावे केला होता, यानंतर यूएस ओपन (2006), ऑस्ट्रेलियन ओपन (2008) आणि त्यानंतर 2012 – 14 मध्ये फ्रेंच ओपन आपल्या नावे केले. एवढेच नाही तर शारापोवाचे नाव फोर्ब्सच्या यादीत जगातील सर्वात जास्त कमाई करणारी खेळाडू म्हणून देण्यात आले होते.
मार्च 2016 मध्ये शारापोवाला एका औषधांचे सेवन केले होते ज्यानंतर तीला वर्ल्ड अँटी-डोपिंग एजेंसी (वाडा) ने प्रतिबंधित औषधांच्या यादीत टाकले होते. यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने नियमांतर्गत टेनिस खेळण्यापासून निलंबित केले होते. या निलंबनानंतर शारापोवाचा ग्रीफ कमी झाल्याने तिची रॅंकिंग कमी झाली होती.