UP चे ‘हे’ टॉप -5 गुन्हेगार, ज्यांच्याविरूद्ध ऑपरेशन क्लीनमध्ये गुंतलेय योगी सरकार !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर यूपीमध्ये गुन्हेगारांचे ऑपरेशन क्लीन सुरु झाले आहे. कारागृहातील मुख्तार अन्सारी आणि त्याचा शार्प शूटरपासून अतीक अहमद आणि खान मुबारकवर योगी सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. यूपी सरकारच्या या यादीमध्ये मुख्तार अन्सारी, अतिक अहमद, त्रिभुवनसिंग उर्फ पवन कुमार, उमेश राय उर्फ गौरव राय, खान मुबारक, बबलू श्रीवास्तव आणि ब्रिजेश सिंह यांच्या नावांचा समावेश आहेत. हे राज्यातील अव्वल गुन्हेगार आहेत ज्यांच्याविरूद्ध योगी सरकार आता कारवाई करताना दिसत आहे.

यूपी सरकारने टॉप गुन्हेगारांची यादी तयार करून अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्तार अन्सारी हे या यादीतील पहिले नाव आहे. पंजाबच्या रोपर तुरुंगात बंद असलेल्या मुख्तार अन्सारीवर हत्या, अपहरण आणि खंडणीपासून 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मुख्तार अन्सारीचा शार्प शुटर उमेश राय उर्फ गौरा राय गुन्हेगारांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. सध्या तो रामपूर कारागृहात बंद आहे. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीच्या दुनियेचे तिसरे नाव मिर्झापूर कारागृहात बंद असलेले त्रिभुवनसिंग उर्फ पवन कुमार असे आहे. उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर अतिक अहमद आहे, जो सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात बंद आहे. अतिकवर एकूण 109 गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारांच्या यादीत खान मुबारक पाचव्या क्रमांकावर आहे. तो लखनऊ कारागृहात बंद आहे आणि पूर्वी छोटा राजन टोळीशी संबंधित होता. शासनाच्या ऑपरेशन क्लीनची ही पहिली फेरी आहे. पण बबलू श्रीवास्तवपासून सुभाष ठाकूर आणि ब्रिजेश सिंहपर्यंत सर्व गुन्हेगारांच्या हिशोबाची मोजणी आता होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like