निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स

पोलीसनामा ऑनलाइन – उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात. निरोगी राहण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा ठरतो. उन्हाळ्यात फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. फळ्यांमध्ये जीवनसत्व आणि इतर पौष्टीक घटक फायदेशीर ठरतात.

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. थंड पेयाचे सेवन करणे टाळा. कारण ही पेयं शरिरासाठी घातक ठरू शकतात. मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे. पुरेशी झोप घ्यावी. सकारात्मक विचार करावा आणि नेहमी आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करावा. एखाद्या छंदामध्ये किंवा आवडत्या कामामध्ये गुंतून गेल्यास आनंद मिळतो. थोडीशी विश्रांती घेण्यासाठी छंद मदत करतो. यातून मानसिक आराम मिळतो. निरोगी राहण्यासाठी व्यायाम खूपच महत्वाचा आहे. व्यायामामुळे शरीर निरोगी राहते.