TIPS : ‘या’ 5 मार्गांनी वाचवा आपल्या फोनची ‘बॅटरी’, जास्त काळ टिकेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजकाल स्मार्टफोन हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अलार्म सेट करायचा असेल किंवा बातमी जाणून घ्यायची असेल की पेमेंट करायचे असेल किंवा चित्रपट पाहायचा असेल, अशी अनेक छोटी-मोठी कामे स्मार्टफोनद्वारे आपण करतो. ही कामे करण्यासाठी स्मार्टफोनला बॅटरीची आवश्यकता असते आणि आपण सर्व वेळ पॉवर बँक सोबत घेऊन फिरू शकत नाही. अशा परिस्थितीत फोनची बॅटरी वाचविणे खूप महत्वाचे असते. आज आम्ही आपल्याला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्या आपल्या कामी येतील.

ब्लूटुथ आणि लोकेशन सर्व्हिस बंद ठेवा:

जीपीएस आणि ब्लूटुथ चालू ठेवल्याने फोनची बॅटरी जलद गतीने कमी होते. गरज नसल्यास या दोन्ही फीचर्सना ऑफ करावे. ही दोन्ही फीचर्सना क्विक अ‍ॅक्सेस पॅनेलमधून चालू आणि बंद केले जाऊ शकतात.

डिस्प्ले ब्राईटनेस कमी ठेवा:

डिस्प्ले हा फोनचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण त्याचा ब्राईटनेस जास्त ठेवल्यास आपल्या बॅटरीचा जास्त वापर होईल. अशा परिस्थितीत आपल्याला अधिक ब्राइटनेसची आवश्यकता नसल्यास, सामान्यत: ते कमीच ठेवा. अशा प्रकारे आपली बॅटरी देखील वाचेल.

सर्व अनवॉन्टेड बॅकग्राउंड अ‍ॅप्स बंद करा:

बॅकग्राउंडला असलेले अ‍ॅप्स प्रोसेसरला कार्यरत ठेवतात. अशा परिस्थितीत हे बॅटरीही खातात. त्यामुळे प्रोसेसरचा वापर कमी करण्यासाठी आणि बॅटरी वाचवण्यासाठी आपण वापरत नसलेले सर्व बॅकग्राउंड अ‍ॅप्स बंद करा.

ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचरला बंद करा:

या फीचरच्या मदतीने आपण तारीख, वेळ आणि बॅटरीचा क्विक लुक घेण्यास सक्षम असतो. परंतु नेहमी यास ऑन ठेवल्याने फोनची बॅटरी जलद गतीने कमी होते. अशा परिस्थितीत त्यास बंद करा किंवा पॉवर सेव्हिंग मोडमध्ये ठेवा.

लाईव्ह वॉलपेपर वापरू नका:

जेव्हा लाईव्ह वॉलपेपर वापरली जातात, तेव्हा डिस्प्ले हायर फ्रिक्वेंसीवर अपडेट होतो. यामुळे देखील मोठ्या प्रमाणात बॅटरी कमी होते. स्क्रीनला हाय रेटमध्ये रिफ्रेश करण्याव्यतिरिक्त फोनची संसाधने देखील वापरली जातात. अशा परिस्थितीत ते बंद ठेवणे चांगले असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like