संतापजनक ! अनैतिक संबंधातून ५ वर्षाच्या मुलाची हत्या

घटना मध्य प्रदेशची आरोपीला जेरबंद केले मुंबई पोलिसांनी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून तिच्याच पाच वर्षाच्या लहान मुलाची निर्घुण हत्या करुन मध्य प्रदेशातून मुंबईत पळून आलेल्यास पवई पोलिसांनी अटक केली. संजीव पांडे (वय २६, रा. जि़रिवा, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे. पांडे याचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. तिला पाच वर्षाचा मुलगा होता. यातून त्यांच्यात वाद होत असे. या वादातून रागाच्या भरात पांडे याने या मुलाची हत्या केली व तो मुंबईला पळून आला होता.

मध्य प्रदेशचे पोलीस पथक पवई पोलीस ठाण्यात आले होते. या पथकाकडे आरोपीचे डी. एन. रोड अंधेरी आणि त्याचा भाचा शुभम याचे तुंगा, पवई असे टॉवर लोकेशन प्राप्त होते. या माहितीच्या आधारे पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड व त्याच्या पथकाने आरोपी आणि त्याच्या भाच्याचे नवीन सीडीआर प्राप्त करुन घेतले. त्या आधारे तांत्रिक तपास करुन गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता अंधेरी येथील डी. एन. नगरमधील पंचम सोसायटीतून संजीव पांडे याला ताब्यात घेतले. प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like