संतापजनक ! अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलीला प्रियकरासोबत मिळून आईने दिले चटके

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आईने तिच्या प्रियकरासोबत मिळून गॅसवर वाटी गरम करून अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पोटच्या ५ वर्षीय चिमुकलीला सर्वांगावर चटके दिले. त्यानंतर जिवाच्या आकांताने रडणाऱ्या मुलीला प्रियकराने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना मुंकुंदवाडी येथे समोर आली आहे. मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

राहूल रावसाहेब पवार (रा. राहूलनगर, कातपूर, ता. पैठण) असे प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकरावर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर य़ासंदर्भात मुलीच्या काकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीच्या वडीलांना अर्धांगवायु असल्याने तिची आई पतीला सोडून तीन मुलांसह राहूल पवार य़ाच्यासोबत मुकुंदवाडी परिसरात राहण्यास आहे. मात्र तिची मुलंच तिच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होती. मंगळवारी दुपारी राहूलने ५ वर्षीय मुलीला बाहेर जाण्यास सांगितले. परंतु ती घरातच खेळत असल्याने राहूलने गॅसवर वाटी गरम केली आणि तिच्या सर्वांगावर चटके दिले. त्यानंतर त्याने तिच्या ओठावर जबर चावाही घेतला. यानंतर तिला जबर मारहाण केली आणि यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला २३ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने संबंधित महिलेच्या भावाने तिच्या दिराला हा प्रकार सांगितला. त्यानंतर ते औरंगाबादला आले. त्यांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like