२०२३ च्या वर्ल्डकपची तयारी सुरु, ‘हे’ सात खेळाडू भारतीय संघातील स्टार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप मधील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाच्या पराभवानंतर आता भारतीय संघाने हा पराभव मागे टाकत विंदूज दौऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. लाखो क्रीडा रसिकांच्या स्वप्नाचा चुराडा झाल्यानंतर आता भारतीय संघ आपल्या पुढच्या तयारीला लागला आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आता पुढील वर्ल्डकपचा विचार करत असून २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्डकपच्या तयारीसाठी भारताने आतापासूनच कंबर कसली आहे. भारताकडे सध्या अनेक युवा खेळाडू असून त्यांना या दृष्टीने यातर करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापन आणि निवड समितीसमोर आहे. पुढील वर्ल्डकपमध्ये असे तरुण खेळाडू आहेत जे पुढील वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकतात.

हे आहेत पुढील तरुण खेळाडू
१) शुभमन गिल –
भारतीय क्रिकेटमधील काही तरुण प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक म्हणजे हा शुभमन गिल. पंजाबसाठी प्रथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्या या खेळाडूला भारतीय संघात लवकरच स्थान मिळू शकते. आयपीएलमध्ये देखील त्याने उत्तम कामगिरी पार पाडली असून त्याने याच बळावर जानेवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघामध्ये स्थान मिळवले होते. अंडर-१९ वर्ल्डकप मध्ये आपल्या शानदार कामगिरीने त्याने सर्वांना चकित केले होते. जुनियर स्तरावर सर्वात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे.

२) श्रेयस अय्यर
चौथ्या क्रमांकासाठी सध्या भारतीय संघ मजबूत आणि दीर्घ काळ खेळू शकणाऱ्या खेळाडूच्या शोधात आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरवर भारतीय संघात हि जबाबदारी दिली जाऊ शकते. आतापर्यंत भारतीय संघासाठी त्याने ६ सामने खेळले असून यामध्ये त्याने २९३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने मुंबईसाठीदेखील उत्तम कामगिरी बजावली आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये त्याने खेळाडू म्हणून आणि कर्णधार म्हणून देखील उत्तम कामगिरी केली असून चौथ्या क्रमांकासाठी त्याला भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.

३) खलील अहमद
जहीर खान आणि आशीष नेहरा यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची गरज आहे. त्यामुळे खलील अहमद हि जबाबदारी पार पाडू शकतो. त्याने भारतासाठी आतापर्यंत ८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यापुढे तो भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकेल असे भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. राजस्थानसाठी प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या खलील याने मागील वर्षी आशिया चषकात भारतासाठी पदार्पण केले होते.

४) नवदीप सैनी
दिल्लीकडून प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या या गोलंदाजाने देखील आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केलं आहे. अफगानिस्तानविरुद्ध त्याला कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र या सामन्यात त्याला विशेष काही करता आले नव्हते. मात्र भविष्यात तो भारतीय संघासाठी लंबी रेस का घोडा ठरणार असल्याने त्याचा समावेश भारतीय संघात केला जाणार आहे.

५) श्रेयस गोपाल
कर्नाटकसाठी प्रथमश्रेणी सामने खेळणाऱ्या गोपालसाठी भारतीय संघाचे दरवाजे लवकरच उघडू शकतात. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी तो दमदार कामगिरी करत आहे. लेगस्पिन बरोबरच तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी देखील करू शकतो. त्यामुळे त्याचा देखील दीर्घकाळासाठी विचार करण्यात येत आहे.

६) दीपक चहर
२६ वर्षीय वेगवान गोलदाजाने आपल्या स्विंग गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. सामन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ठिकाणी तो गोलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर तो खालच्या क्रमांकावर फलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये त्याने या वर्षी १७ सामन्यांत २२ विकेट घेऊन उत्तम कामगिरी केली होती.

७) पृथ्वी शॉ
भारताला आयसीसी अंडर -१९ वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या या खेळाडूला देखील लवकरच भारताच्या एकदिवसीय सामन्यांत संधी मिळू शकते. त्याने भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत ६ सामन्यांत २६१ धावा केल्या असून यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे. आयपीएलमध्ये दिल्ली संघासाठी देखील तो उत्तम कामगिरी पार पाडत असून भारतीय संघात देखील तो मजबुती देऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’