भारतीय स्टेट बँकेची नवीन सुविधा ! आता ATM मधून काढता येणार मुदत ठेवीतील (FD) रक्कम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अनेक खातेदार बँकेत सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी मुदत ठेवीमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक करत असतात. कमी मुदतीपासून ते अधिक (वार्षिक) मुदतीसाठी यामध्ये खातेदाराला गुंतवणूक करता येते. मात्र भारतीय स्टेट बँकेने खातेदारासाठी आता एक नवीन आणि लोकांना सोयीस्कर होईल अशी सेवा आणली आहे. यामध्ये आता खातेदार त्यांचे मुदत ठेवीची रक्कम आता एटीएम (ATM) मधून घेऊ शकणार आहे. या योजनेमुळे ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

बँकांनी इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगद्वारे घरबसल्या सर्व व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध केल्यानं बँकेत न जाताही मुदत ठेवीसह इतर ठेवयोजनांमध्ये घरबसल्या गुंतवणूक करता येणार आहे. तर पूर्वी मुदत ठेव मधून रक्कम काढण्यासाठी बँकेमध्ये जाऊन अर्ज करून रक्कम घ्यावी लागत होती. मात्र आता थेट ATM मधून हि रक्कम काढू शकतो. तर या योजनेचं नाव मल्टी ऑप्शन डिपॉझिट असं आहे.

कमीतकमी १० हजार गुंतवणूक –

या योजनेमध्ये १००० रुपयांच्या पटीत रक्कम काढता येते. तसेच, रक्कम जमा करू शकतो. आणि १००० रुपयांच्या पटीत रक्कम काढता देखील येते. या योजनेमध्ये स्टेट बँकेच्या अन्य मुदत ठेवी एवढेच व्याज मिळते. कमीत कमी १० हजार रुपये गुंतवून व्यक्ती खाते ओपन करू शकते. तर खाते ओपन झाल्यावर १००० रुपये प्रमाणे रक्कम जमा करू शकतो. यामध्ये दीर्घ गुंतवणुकीसाठी कसलीही अट नाही.

या योजनेनुसार ATM द्वारे रक्कम मिळणार –

Multi option deposit योजनेच्या माध्यमातून ATM द्वारे रक्कम काढण्याची सेवा दिली आहे. कारण, योजना ग्राहकाच्या चालू अथवा बचत खात्याशी जोडलेली असते. जमा केलेल्या रकमेवर रक्कम काढताना व्याज देखील दिला जातो. मुदतीआधीच यामधील सर्व पैसे काढायचे असेल तर बँकेत न जाता घरातूनच हे काम करता येणार आहे. ATM च्या सुविधेमुळे अनेक लोकांना कोणत्याही अडीअडचणीत रक्कम काढता येणार आहे.