मिरज पालिकेचा निकाल फिक्स, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

मिरज महापालिकेच्या निवडणूकीत प्रभाग चारमधील उमेदवारांच्या मतांची आकडेवारी निकालापूर्वीच फिक्स झाली असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहे. या मेसेजमुळे मिरज शहरात खळबळ उडाली असून उमेदवार व चिन्हांच्या यादीत फेरफार करुन निकाल फिक्स केल्याची अफवा पसवण्यात येत आहे. अशी अफवा पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध आज (शनिवार) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4bb03eb9-9d86-11e8-a799-e958f05e0cde’]
उमेदवारांच्या यादीत निवडणूक निकालानंतर मतदानाचे आकडे लिहून मतदानापूर्वीच उमेदवारांचे मतदानाचे आकडे फिक्स असल्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी झाल्याची तक्रार अशरफ वानकर व तानाजी रूईकर यांनी  तक्रार केली. यानंतर आयुक्तांच्या कक्षात तक्रारदार व नागरिकांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता कुलकर्णी, उपायुक्त सुनील पवार यानी निवडणूक कामकाजाची सर्व कागदपत्रे उपस्थित नागरिक आणि तक्रारदार यांना दाखवली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बेकायदेशीर कृती करून निवडणूक प्रकियेबाबत संभ्रम निर्माण करणे व निवडणूक प्रकियेबाबत अपप्रचार केल्याबद्दल सबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त श्रीकांत पाटील यांनी सांगली शहर पोलिसात निवडणूक प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर अपप्रचार केल्याबद्दल अज्ञाताविरुध्द फिर्याद दिली आहे.

महापालिका निवडणुकीत प्रभाग चारमधील भाजप उमेदवारांच्या मतदानाच्या आकडेवारीचे अगोदरच सेटिंग झाल्याच्या प्रचारामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मतदानाच्या आकडेवारीमुळे खळबळ उडाली. प्रभाग चारमधील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीनंतर त्यांना मिळालेल्या चिन्हांसह प्रसिध्द करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरून काढून नेऊन अज्ञाताने निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यावर चारही गटातील मतांची आकडेवारी खोडसाळपणे लिहून सोशल मीडियावर व्हायरल केली.
[amazon_link asins=’B073YY7YCG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5a6e3337-9d86-11e8-b694-cb88c90ad15f’]

यादीमुळे पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक मतदानात घोटाळा झाल्याचा दावा करीत होते. निकाल १८ जुलै रोजीच तयार झाल्याचा आणि प्रभाग चारमध्ये मतदानाची व मतमोजणीची आकडेवारी जुळत नसल्याचा सोशल मीडियावरून प्रचार सुरू असल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. प्रभाग चारमधील विजयी झालेल्या भाजप उमेदवाराच्या निवडीविरुध्द मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आक्षेप घेऊन अपक्ष उमेदवार अनिलभाऊ कुलकर्णी व शुभांगी रूईकर यांनी न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियावरील मतदानाची आकडेवारी बोगस असल्याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर निवडणूक निकाल व इव्हीएम यंत्राबाबत अपप्रचार केल्याप्रकरणी अज्ञाताविरध्द गुन्हा दाखल केला आहे.