संविधानाचे वाचन करून इयत्ता ३ री आणि ४ च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन –  प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारीवली येथे पाहिल्यादा इयत्ता ३ री आणि ४ च्या विद्यार्थ्यांन हस्ते ध्वजारोहनाचा सोहळा पार पडला. या प्रसंगी शाळेतीळ इयत्ता ३ री मध्ये शिकत असलेली विद्यार्थ्यांनी देवयानी सचिन सोलसे व इयत्ता ४ मध्ये शिकत असलेल्या ऋषभ देवेंद्र बांगर या चिमुकळ्यांच्या हस्ते झेंडावंदन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पणे संचलन करून संविधानाचे वाचन करून तिरंग्याला सलामी देत प्रजासत्ताक दिन साजरा केला ध्वजारोहणाचा मान विद्यार्थीना मिलाला असल्याने पालक, विद्यार्थी,गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला याप्रसंगी पोलीस पाटील भाऊराव भोईर,माजी सरपंच हर्षदा भोईर, ग्रामपंचायत सदस्य जयश्री ठाकरे,सविता बांगर,अरुण भोईर,शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी परब,शिक्षिका सुवर्णा राजने विद्यार्थी,पालक वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताकदिनी मुरबाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष स्नेहल देसले यांनी नेत्र चिकित्सा व महिलांना साड्याचे वाटप केले तर दिशा अकॅडमी अंतर्गत रक्त गट,रक्त तपासणी,ईसीजी नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या आर पी आय सेक्युलर राजेश गायकवाड युक तालुका अध्यक्ष, लक्षुमन खोळंबे तालुका अध्यक्ष, निखिल अहिरे,किशोर गायकवाड,ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या मार्गदर्शनाखाली साजई खरबे वाडी, फंसोली वाडी येथे शयक्षणिक साहित्य वाटप केले तर सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड यांनी सिद्धगडावर स्वच्छता मोहीम राबवून ध्वजारोहण करून आनंद साजरा केला.