तिबेटमध्ये भूस्खलन : अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाम आणि अरुणाचल प्रदेशासमोर सध्या पुराच्या संकटाचा धोका निर्माण झाला आहे. चीनच्या अखत्यारित येणाऱ्या तिबेटमध्ये भूस्खलन झाल्यानं सियांग नदीचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार झाला आहे. डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यानं  सियांग नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. आसाममधील १० गावं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. तिबेटमधील भूस्खलन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ देऊन चीन भारताचं नुकसान करु शकतो, असा संशय भारतीय यंत्रणांना आहे.

खेड सबजेलमधून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील २ आरोपी गज कापून पळाले

यारलुंग सांग्पो नदी अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग या नावं ओळखली जाते तर आसाममध्ये ही नदी ब्रह्मपुत्रा म्हणून परिचित आहे.सियांग नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अरुणाचल प्रदेशातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१६ ऑक्टोबरला तिबेटमध्ये भूस्खलन झालं आहे . तिबेटमधील भूस्खलन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे.त्यामुळे यारलुंग सांग्पो म्हणजेच सियांग नदीचा मार्ग बंद झाला. मात्र भूस्खलनामुळे तयार झालेला बांध फुटल्यास साचलेलं पाणी अतिशय वेगात वाहू लागेल. त्यामुळे खालील भागात असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि आसामला धोका आहे.  या नदीचं पाणी सोडण्यास सुरुवात करण्याची आल्याची माहिती चीननं भारताला दिली आहे. या पाण्याचा वेग प्रति सेकंद १८ हजार क्यूबिक मीटर इतका आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली गेला आहे. आसामच्या धेमाजी, डिब्रूगढ, लखीमपूर, तिनसुकिया आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

तिबेटमधील भूस्खलन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. तसेच सियांग नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अरुणाचल प्रदेशातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.  चीनकडून अनेकदा सतर्कतेचा इशारा उशीरा दिला जातो. त्यामुळे नुकसान टाळता येणं अवघड होतं. गेल्या वर्षी काझीरंगामध्ये पूर आला होता. त्यात अनेक प्राण्यांनी जीव गमावला होता. या पुराची माहितीदेखील चीननं भारताला उशीरा दिली होती. नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ देऊन चीन भारताचं नुकसान करु शकतो, असा संशय भारतीय यंत्रणांना आहे.