सोनमचे ‘बोल्ड सीन्स’ पाहण्यासाठी लोक तडफडायचे, तिनं थाटलं 45 व्या वर्षी दुसरं लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 90 दशकाचा असा काळ होता जेव्हा हिरोईन बिकीनी घालण्यास नकार देत असतं. अशात कशाचीही पर्वा न करता अभिनेत्री सोनमने बोल्ड अ‍ॅक्ट्रेस म्हणून आपली ओळख बनवली. तिला साईन करण्यासाठी अक्षरश: निर्मात्यांच्या रांगा लागत असत. सोनमचे खरे नाव आहे बख्तावर मुराद खान. सोनमला ओए ओए गर्ल म्हणून सगळे ओळखतात.

Sonam

अवघ्या 14 व्या वर्षी तिने विजय या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. यात तिचे जबरदस्त किसिंग सीन्स होते. यानंतर तिची बोल्ड अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळख तयार झाली. तिच्या पहिल्याच सिनेमाने प्रचंड धुमाकूळ घातला. याव्यतिरीक्त 1989 मध्ये तिने त्रिदेव सिनेमात काम केले. यात तिच्यासोबत नसीरुद्दीन शहा होते. विजय आणि त्रिदेवमुळे सोनम रातोरात स्टार झाली. यावेळी ती 17 वर्षांची तर नसीरुद्दीन शहा 38 वर्षांचे होते. या सिनेमात तिच्यावर चित्रीत ओए ओए हे गाणं प्रचंड गाजलं. लोक तिला ओए ओए गर्ल म्हणून ओळखू लागले.

यानंतर सोनमने केलेल्या मिट्टी और सोना या सिनेमात सोनमने अनेक बोल्ड सीन्स दिले. लोक तासन् तास उभे राहून या सिनेमाचे तिकीट खरेदी करत होते. यात तिचे काही न्यूड सीन्सही होते. असे म्हणतात की, केवळ तिचे बोल्ड सीन्स पाहण्यासाठी आलेले लोक सोनमचे बोल्ड सीन्स पाहिल्यानंतर थिएटरमधून निघून जायचे. यानंतर थिएटर रिकामं होत असे. तिने एकूण 25 सिनेमात काम केलं आहे.

सोनमच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर 19 व्या वर्षी तिने तिच्याहून 17 वर्षे मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न केलं. राजीव राय असं त्यांचं नाव आहे. त्रिदेवच्या सेटवरच दोघांचं सूत जुळलं. 1991 मध्ये दोघांनी लग्न केलं. 10 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सोनमने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 15 वर्षे विभक्त रहात तिने 2016 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर 2017 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी तिने पुदुच्चेरीचे डॉक्टर मुरली पोडुवलसोबत दुसरं लग्न केलं.

90 दशकातील एक काळ गाजवणारी सोनम आज बॉलिवूडमध्ये कुठेच नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like