कोणी नगरसेवक शोधून देतयं का नगरसेवक

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

नेहमीच पुणेकर आपल्या खोचक युक्त्यांसाठी पुढे असतात. त्यात खास पुणेकरांच्या पुणेरी पाट्या तर हटकेच. अनेक विषयांवर इतरांचे लक्ष वेधण्यासाठी पुणेकर पाट्या लावतात मग काय असाच एक हटके फ्लेक्स पुण्यातील प्रभाग क्रमांक 33 मधील चव्हाण बागेच्या परिसरात लावण्यात अाला असून, त्याच्यावर चक्क नगरसेवक हरवले आहेत असं लिहलं आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3def02f7-a9ec-11e8-9ccd-e9e8d1e126cf’]

त्याचं झालं असं की, प्रभाग क्रमांक 33 मधील रस्ते, ड्रेनेज यांची दुरावस्था झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यात सतत अपघात होतात. अनेकदा सांगून देखील त्याच्यावर उपायोजना होत नसल्यामुळे हा हटके उपाय याच प्रभागामधील एका सजग नागरिकाने शोधून काढला आणि चक्क नगरसेवकच हरवले असल्याचा फ्लेक्स लावला. सध्या या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरु असून, फ्लेक्सच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.

पेट्रोल – डिझेलच्या दरात विक्रमी वाढ 

पुणे महानगरपालिकेच्या २०१७च्या निवडणुकीपूर्वी शहरातील अनेक भागात नगरसेवक हरवले आहेत, अशा फ्लेक्सबाजीतून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या फ्लेक्सबाजीला दीड वर्ष होत नाही, तोवर आज पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ मध्ये नगरसेवक हरवले आहेत. रोडवर ड्रेनेज मैलापाणी, रस्त्याची प्रचंड दुरावस्था, अपघातांची मालिका सुरू अशा मजकुराचा फ्लेक्स लावण्यात आला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहिर 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like