विमानानं प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी ! ‘या’ कंपनीनं सुरू केली WhatsApp चेक-इन सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मे मध्ये कोरोनो व्हायरस महामारी दरम्यान सोशल डिस्टंसिंग सुनिश्चित करण्यासाठी सरकारने सर्व प्रवाशांना उड्डाण करण्यापूर्वी ४८ तास ते ६० मिनिटांपर्यंत ऑनलाइन चेक इन करणे अनिवार्य केले होते.

कोरोनाच्या या संकटकाळात कंपन्या प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशात स्वस्त हवाई प्रवास देणारी कंपनी स्पाइसजेटने नवीन चेक-इन सुविधा सुरू केली आहे. कोरोनामुळे सरकारने नवीन नियम बनवले आहेत. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही वेब चेक-इन करत नाही, तोपर्यंत तुम्हाला विमानतळाच्या आत जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व प्रवाश्यांसाठी वेब चेक इन आवश्यक आहे.

स्पाइसजेटने सुरु केली व्हाट्सऍपवर नवीन सुविधा
कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या सेवेसाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ६००००००००६ वर जाऊन हाय लिहावे लागेल. यानंतर “Ms Pepper” तुमच्या फ्लाइटशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.

कंपनीचे म्हणणे आहे की, कमकुवत नेटवर्कमध्येही व्हॉट्सऍप चांगले काम करेल. सर्व प्रवासी सहजपणे याचा लाभ घेऊ शकतात.

देशात २५ मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरु केली गेली आहेत. पण कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारने अनेक कडक नियम लागू केले आहेत.