Lockdown : 14 एप्रिल नंतर विमान सेवा सुरु होईल की नाही, केंद्रीय मंत्र्यांनी दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे, बस आणि उड्डाण सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. 14 एप्रिलनंतर उड्डाण सेवा सुरू होणार की नाही याविषयी प्रत्येकाच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच रेल्वेने निवडक गाड्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत आरक्षण बंद ठेवले आहे. त्याचवेळी कोरोना विषाणूमुळे एअर इंडियाने यापूर्वीच 30 एप्रिलपर्यंत बुकिंग न घेण्याची घोषणा केली होती.

दुसरीकडे, इंडिगो ने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. उड्डाण सेवांबाबत नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की कोरोना संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत विमानसेवा सुरू होऊ शकत नाही. ट्विटरवर ही माहिती देताना ते म्हणाले की एकदा आम्हाला खात्री वाटली की कोरोना विषाणूची लागण नियंत्रणात आहे, त्यानंतर भारतातल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणांवरील बंदी हटविली जाईल. ते म्हणाले की आता यास वेळ लागेल. म्हणजेच 14 एप्रिलनंतरही विमानसेवा सुरू होणार नाही.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विटरवर लिहिले आहे की या लॉकडाऊनचा परिणाम देशाच्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर झाला आहे. यामुळे लोकांना समस्या येत आहेत. हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशातील कोरोनाच्या प्रकरणांवर पूर्णपणे नियंत्रण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विमानसेवा सुरू करता येणार नाही.