1 सप्टेंबरपासून महागणार Flights Ticket, सरकारनं वाढवली विमान प्रवासासंबंधीची ‘ही’ फीस

नवी दिल्ली : जर तुम्ही विमान प्रवास करण्याचे ठरवले होते, किंवा नेहमी करत असाल तर ही बातमी तुमच्या खिशाला कात्री लावणारी आहे. कारण केंद्र सरकारने एयरपोर्टवर प्रवाशांकडून घेतल्या जाणार्‍या सिक्युरिटी फीमध्ये वाढ केली आहे. यावेळी सरकारने अ‍ॅव्हिएशन सिक्युरिटी फीमध्ये 10 रुपये प्रति प्रवासी वाढ केली आहे. आता अ‍ॅव्हिएशन सिक्युरिटी फी वाढून 160 रुपये प्रति प्रवासी झाली आहे. ही वाढ 1 सप्टेंबरपासून जारी होणार्‍या तिकीटांवर लागू असेल.

या कारणामुळे वाढवली फी
एयरपोर्टवर वाढत्या सुरक्षेचा खर्च चालवण्यासाठी अ‍ॅव्हिएशन सिक्युरिटी फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे विमान प्रवास महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीआयएसएफ देशातील 61 एयरपोर्टवर सुरक्षा संबंधी उपाययोजना करते. कोरोना व्हायरसमुळे एयरपोर्टवर फुटफॉलमध्ये कमतरता आली आहे, ज्याकारणामुळे सुरक्षा खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय सीआयएसएफ प्रवाशांच्या तपासणीसाठी पीपीई सूट, मास्क, ग्लोव्हज यासारख्या वस्तूंचा वापर करणार आहे, ज्याकारणामुळे सुरक्षेचा खर्च वाढणार आहे.

अ‍ॅव्हिएशन सिक्युरिटी फी वाढीबाबत सिव्हिल अ‍ॅव्हिएशन मिनिस्ट्रीने 13 ऑगस्टला आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, सरकारने एयरक्राफ्ट नियम 1937 मधील अधिकारानुसार अ‍ॅव्हिएशन सिक्युरिटी फीच्या वाढीला मंजूरी दिली आहे.

मागच्या वर्षी वाढवले 20 रुपये
सरकारने अ‍ॅव्हिएशन सिक्युरिटी फीमध्ये 2019 मध्ये 20 रुपयांची वाढ करून 150 रुपये प्रति प्रवासी केली होती. तेव्हा एयरपोर्ट ऑपरेटर्सने म्हटले होते की, अनेक वर्षापूर्वी ठरवेलेल्या 130 रुपयांच्या अ‍ॅव्हिएशन सिक्युरिटी फी सीआयएसएफच्या तैनातीचा खर्च पूर्ण करण्यासाठी अपूरी होती. अशाच प्रकारे स्थानिक फ्लाइटने अंतरराष्ट्रीय प्रवासावर सुद्धा सिक्युरिटी फीमध्ये वाढ केली आहे.