‘या’ कारणामुळं 7 मे रोजी परदेशात अडकलेले भारतीय मायदेशी परतणार नाहीत

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना 12 देशांमधून विशेष विमानाने सरकार परत आणणार आहे. यासाठी बुधवारपासून विमाने परदेशात पाठविली जाणार होती आणि 7 मेपासून भारतीय परदेशातून मायदेशी परतणार होते. परंतु आता 24 ते 48 तासांचा उशीर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या देशांमधून भारतीयांना परत आणले जाणार आहे त्या सरकारचे म्हणणे होते की, भारतीय विमानाचे चालक आणि केबिन क्रू यांची कोविड 19 चाचणी सकारात्मक नसावी. अशा परिस्थितीत पायलट आणि केबिन क्रू यांची कोविड 19 ची चाचणी आता घेण्यात येत आहे. यामुळे आता परदेशातून भारतात येणार्‍या भारतीयांना थोडा उशीर होणार आहे.

सरकारच्या योजनेनुसार, सहा देशांमधून भारतीयांना घेऊन जाणारी विमाने 7 मे रोजी भारतात येणार होती, पण आता हे विमान केवळ 8 किंवा 9 मे रोजी भारतात परत येऊ शकेल. अमेरिकेहून सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईकडे जाणारी पहिली उड्डाण 7 मे रोजी सकाळी 7 वाजता येणार होती. परंतु आता याला 48 तास उशीर होणार आहे.

वॉशिंग्टन डीसी ते दिल्ली हे विमान 7 मे रोजी दुपारी 1 वाजता येणार होते. परंतु आता ही उड्डाण 9 मे रोजी होण्याची शक्यता आहे. लंडनहून मुंबईकडे जाणारी पहिली उड्डाण 6 मे रोजी दुपारी 1.30 वाजता येणार होती. पण आता दोन दिवसांचा उशीर होण्याची शक्यता आहे.

अडकलेल्या भारतीय नागरिकांना परदेशातून आणण्यासाठी भारत सरकारची 7 ते 13 मे दरम्यान 64 उड्डाणे चालविण्याची योजना होती. पण आता कोविड 19 चाचणीच्या कारणामुळे ही योजना 13 मेपर्यंत वाढवू शकते. मंगळवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडिया आणि त्याच्या सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस या विशेष उड्डाणे करणार आहेत. युएई, यूके, यूएसए, कतर, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश, बहरीन, कुवैत आणि ओमान या 12 देशांमधून ती भारतीयांना मायदेशी परत आणेल