ताज्या बातम्या

नागपुरातून गोव्याकरीता 29 नोव्हेंबरपासून विमानसेवा !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन  नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हिवाळी वेळापत्रकानुसार (According to the winter schedule) चार नवीन विमाने सुरू (Launched four new aircraft) केली जाणार आहेत. यात इंडिगो एअरलाईन्स पुन्हा एकदा दिवाळी आणि क्रिसमसच्या सुटीत गोवा विमानसेवा सुरू करीत आहे. या विमानाचे संचालन 29 नोव्हेंबर ते 27 मार्चपर्यंत राहणार आहे. आठवड्यात सर्व दिवस विमान पुणे विमानतळावरून सायंकाळी 5.25 वाजता येईल आणि येथून सायंकाळी 5.55 वाजता गोवाकडे रवाना होईल.

याशिवाय इंडिगो 29 नोव्हेंबर ते 26 मार्चपर्यंत सकाळी 6.35 वाजता पुणेकडे विमानाचे संचालन करणार आहे. हे विमान सर्व दिवस राहील. तसेच मुंबईकडे दोन विमानसेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये इंडिगो विमान सकाळी 7.50 वाजता आणि गो -एअर रात्री 8 वाजता रवाना होईल. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या सात शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे.

दररोज केवळ 12 विमाने विभिन्न मार्गावर जात असतात. यात मुंबई आणि दिल्लीकरिता सर्वाधिक उड्डाणे आहेत. पुणेकरिता दोन आणि बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, हैदराबादकरिता केवळ एक विमान चालविण्यात येत आहे.

Back to top button