Flint in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 1 जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था – Flint in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत (Flint in Jammu and Kashmir) तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तीनही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये या भागात चकमक सुरू झाली. या चकमकीत पाकिस्तानचे 3 दहशतवादी ठार (3 Pakistani Terrorists Killed) झाले असून सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आले आहे.

आईजीपी विजय कुमार (IGP Vijay Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस आणि 52 आरआरच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सतर्कता बाळगत सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. तर एक पोलीस शहीद झाला आहे. दरम्यान, ठार मारण्यात आलेले तीन्ही दहशतवादी गुलमर्गमध्ये 3-4 महिन्यांपासून सक्रिय होते आणि ते मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. (Flint in Jammu and Kashmir)

दरम्यान, याआधी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील सौरा भागामध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली होती. मागच्या काही महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमधील अनेक भागांत दहशतवांद्यांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Web Title : Flint in Jammu and Kashmir | jammu and kashmir 3 pakistani terrorists killed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त