आता फ्लिपकार्ट, अॅमेझॉन देणार ‘आधार’ वर झटपट कर्ज

बंगळुरू : वृत्तसंस्था
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन हे दोन्ही ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्स आपल्या ग्राहकांसाठी खास  ऑफर घेऊन आले आहेत .  या ई-शॉपिंग कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक सेलसाठी आधार कार्डवर इन्स्टंट  कर्ज देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाची गरज लागणार नाही. अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपद्वारे ते घेता येणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’faa6e338-cb85-11e8-be8b-13f85c522e52′]
असे  मिळेल इन्स्टंट लोन –
सेलदरम्यान विक्री वाढवण्यासाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन या दोन्ही बड्या कंपन्यांनी हा आधार कार्डची नवी योजना काढली आहे . आधार आयडी क्रमांकावर इन्स्टंट लोन देण्याची तयारी या कंपन्यांनी दाखवली आहे. त्यासाठी मग डेबिट किंवा क्रेडिट कार्डाची गरज लागणार नाही. हे कर्ज ६० हजार रुपयांपर्यंत असेल आणि अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या सेलदरम्यान विक्री वाढवण्यासाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन या दोन्ही बड्या कंपन्यांनी हा आधार कार्डचा नवा फंडा आजमावला आहे. आधार आयडी क्रमांकावर इन्स्टंट लोन देण्याची तयारी या कंपन्यांनी दाखवली आहे. त्यासाठी मग डेबिट किंवा क्रेडिट कार्डाची गरज लागणार नाही. हे कर्ज ६० हजार रुपयांपर्यंत असेल आणि अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपद्वारे ते घेता येणार आहे. साइन अप केल्यावर पॅन आणि आधार क्रमांक दिल्यावर किती कर्ज मंजूर होईल हे ग्राहकांना या अॅपवर पाहता येईल. ग्राहकाचा खरेदीचा पॅटर्न, पेमेंटचा इतिहास आधी गोष्टी ध्यानात घेऊन त्यानुसार हे कर्ज देण्यात येणार आहे. . साइन अप केल्यावर पॅन आणि आधार क्रमांक दिल्यावर किती कर्ज मंजूर होईल हे ग्राहकांना या अॅपवर पाहता येईल. ग्राहकाचा खरेदीचा पॅटर्न, पेमेंटचा इतिहास आधी गोष्टी ध्यानात घेऊन त्यानुसार हे कर्ज देण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’067f91d2-cb86-11e8-b440-87819a8ef2f0′]
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन –
ही इन्स्टंट लोन आधारसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयाचा भंग करणारे असल्याचे काही वकीलांचे म्हणणे आहे. आधारचा खासगी संस्थांनी ओळखपत्रासाठी वापर करू नये, असा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होता. ‘हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं सरळसरळ उल्लंघन आहे. कोर्टाने स्पष्ट म्हटलंय की खासगी कंपन्या आधार कार्डाचे डिटेल्स मागू शकत नाहीत,’ असं माजी अतिरिक्त महाधिवक्ता पी. विल्सन म्हणाले. फ्लिपकार्टचे प्रवक्ता यासंदर्भात म्हणाले की, कंपनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहण्यास बांधील आहे. अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्यानेही नियमांना सर्वोच्च प्राधान्य देण्यास कंपनी बांधील असल्याचं सांगितलं.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B00KGZZ824,B074ZF7PVZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1163da27-cb87-11e8-952a-29d67853a2ba’]