सावधान ! Flipcart आणि Amazon च्या नावाखाली होतेय फसवणूक, सतर्क रहा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या फ्लिपकार्ड आणि अ‍ॅमेझॉनवर फेस्टिव सीजन सेल सुरु आहे. या सेल दरम्यान अनेक फ्रॉड होत आहेत. लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. तुम्ही देखील कोणतीही वस्तू घेताना सावध रहा अन्यथा एका झटक्यात तुमचे अकाऊंट खाली होईल. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन सारख्या वेबसाइट लोकांची दिशाभूल करताना दिसत आहे. तुम्हाला मेसेज येतो की ई – कॉमर्स कंपनी तुम्हाला बंपर सूट देत आहे यासाठी लिंकवर क्लिक करुन लॉगइन करा आणि वस्तू खरेदी करा. परंतू अनेकदा तुमची फसवणूक केली जाते. ‘

या प्रकारचे फ्रॉड सहज ओळखले जाऊ शकतात. फसवणूक करणारे लोक फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या वेबसाइट तयार करतात. डोमेन नेम देखील मिळते जुळते असते. लॉगइन केल्यानंतर पेज हुबेहूब खरे वाटते.

ही आहे फेक वेबसाइट –
या काही फेक वेबसाइट आहेत ज्या फ्रॉड करतात. flipkart.dhamaka-offers.com, flipkart-bigbillion-sale.com जर तुम्हाला अशी कोणतीही वेबसाइट दिसली तर त्यावर क्लिक करु नका. ही वेबसाइट फ्लिपकार्ट सारखी आहे. अशी लिंक तुम्हाला मिळाल्यास तुम्ही त्याचा रिपोर्ट फ्लिपकार्टला करु शकतात.

या वेबसाइटचे पेज खऱ्या वेबसाइटसारखे दिसते परंतू तुम्ही खरेदीनंतर डील केली तर तुम्हाला चांगलाच फटका बसेल. म्हणजेच 10,000 रुपयांच्या किंमतीला असणारी वस्तू येथे तुम्हाला फक्त 1000 रुपयांना किंवा 100 रुपयांना मिळेल. यावर लोक कोणताही विचार न करता क्लिक करतात आणि पेमेंट गेटवेसाठीचा नंबर देतात. हे देखील खरे गेटवे असल्यासारखे वाटते. परंतू तुमची माहिती यातून पेमेंट फ्रॉड करणाऱ्यांना मिळेल आणि तुमची फसवणूक होईल. अशा प्रकारच्या लिंक व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मिडियावर फिरत असतात.

या प्रकारच्या लिंकमध्ये लिहिले असते की, मी तर खरेदी केली आहे, तुम्ही देखील यावरुन खरेदी करु शकतात, सेल लवकरच संपणार आहे. अशा प्रकारे येणारे मेसेज एकदम बोली भाषेत असतात. जेणे करुन तुम्हाला ते खरे वाटतील आणि तुम्ही त्यावर क्लिक कराल.

यापासून स्वत:ची फसवणूक टाळणे सोपे असते. तुम्ही खरेदी करताना डोमेन नेम चेक करा, कोणत्याही प्रकारचे स्पेलिंग चूकीचे असेल तर समजून घ्या ही फसवणूक आहे. कंप्यूटरच्या ब्राऊजरवरील URL टॅब लक्षपूर्वक पहा, तुम्हाला अचूक अंदाज येईल.

visit : Policenama.com