Flipkart Big Billion Days Sale | फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलीयन डेज सेल’ मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी; मिळेल 80 % पर्यंत सवलत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आगामी काळात अनेक मोठे सण आहे. सणासुदीच्या काळात (Sale during Festive season) स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे. जिथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तूवर 80 टक्के सूट (80 percent discount) मिळणार आहे. फ्लिपकार्टचा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. फ्लिपकार्टचा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) 10 ऑक्टोबर पर्यंत लाईव्ह असणार असून या काळात ग्राहकांना खरेदीवर मोठी सूट मिळणार आहे.

या प्रोडक्टवर मिळणार मोठी सूट

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये (Flipkart Big Billion Days Sale) ग्राहकांना Smartphones, Tablets, Smartwatch, Laptops, Earbuds यासारख्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट वर भरभक्कम सूट मिळेल. Flipkart Plus मेंबर्ससाठी आधी सेल सुरू होणार आहे. जे मेंबर नाहीत अशा ग्राहकांना अ‍ॅपवरुन 50 सुपरकॉइनचा वापर करुन सेलमध्ये सुरुवातील खरेदी करता येणार आहे.

नवीन प्रोडक्टस लाँच

या सेलमध्ये Oppo, Motorola, Realme, Poco, Vivo, Samsung चे नवीन प्रोडक्ट्स लाँच होणार आहेत. यामध्ये Moto Tab G20, Motorola Edge 20 Pro, Realme 4K Google TV Stick इत्यादींचा समावेश आहे. कंपनीने यावर्षी बिग बिलियन डे सेलसाठी ICICI बँक आणि Axis बँकेसोबत भागीदारी केली आहे. या बँकेच्या डेबिट कार्ड (Debit card) आणि क्रेडिट कार्ड (credit card) धारकांना विक्री दरम्यान अतिरिक्त ऑफर देण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहक पेटीएम वॉलेट (Paytm Wallet) आणि यूपीआय (UPI) द्वारे पैसे देऊन विशिष्ट कॅशबॅक मिळवू शकतात.

 

किती मिळणार डिस्काउंट

– बिग बिलीयन डे सेलमध्ये सॅमसंग, ओपो आणि विवोच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळेल.

– स्मार्टफोन श्रेणीमध्ये आयफोन 12 (IPhone 12), आयफोन 12 मिनी आणि आयफोन एसई वर सवलत दिली जाईल.

– कंपनी इंटेल प्रोसेसर सह सुसज्ज लॅपटॉप मॉडेलवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देईल. तसेच इतर लॅपटॉप मॉडेल्सवरही सूट मिळणार आहे.

– TWS इयरबडवर 60% सूट, स्मार्टवॉच श्रेणीतील फ्लॅट 70 % पर्यंत सूट आणि साउंडबारवर 80% पर्यंत सूट मिळेल.

– फॅशन आणि अॅक्सेसरीजवर कंपनी 60-80 % पर्यंत सूट देईल. तर फर्निचर तसेच गाद्या खरेदीवर 85 % पर्यंत सूट मिळेल.

 

Web Title : Flipkart Big Billion Days Sale | flipkart big billion days make your wishlist you can get 80 percent discount during sale check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nashik Anti Corruption | ‘आयपीएल’ बेटिंगचा धंदा सुरळीत ठेवण्यासाठी 3 लाखाची लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Job Offer Fraud | एका SMS ने मूर्ख बनवले ! काही क्षणात गमावले 3 लाख रुपये; जाणून घ्या अन् व्हा सावध

Pune Corporation | पुण्यातील रस्ते खोदाईनंतरच्या दुरूस्तीच्या कामांसाठी पुन्हा कोट्यवधीच्या निविदा; महापालिकेचा ‘आंधळ दळतयं कुत्रं पीठ खातयं’चा कारभार