दिवाळीनिमित्त फ्लिपकार्टवर बंपर सेल ! मोबाइल, TV स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्टने बिग दिवाली सेलची तारीख जाहीर केली आहे. 12 ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा सेल फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी 11ऑक्टोबर रात्री 8 वाजताच सुरू होणार आहे. अन्य युजर्ससाठी तो 12 ऑक्टोबर रात्री 12 वाजता सुरू होणार आहे. या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टीव्हीवर मोठी सूट देण्यात येणार आहे.

सेलची वैशिष्ट्ये
सेलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना 10 टक्के इस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. यासाठी फ्लिपकार्ट स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना नो कॉस्ट EMI, एक्स्चेंज ऑफरसह डिस्काउंटवर मोबाइल प्रोटेक्शन प्लान सारख्या सुविधा मिळणार आहेत.

फ्लिपकार्टच्या या बिग दिवाळी सेलमध्ये ‘धमाका डिल्स’ नावाचा एक फ्लॅश सेल देखील आयोजित केला जाणार आहे. या फ्लॅश सेलमध्ये 12am, 8am आणि 4 pm ला मोबाइल फोन्स, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स सामानावर अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे.

या फोनवर सूट मिळणार
सेलमध्ये रेड मी नोट 7, रेड मी नोट 7 एस, रिअल मी5 , विवो Z1 प्रो आणि रिअलमी सी 2 सह अनेक स्मार्टफोन्सवर सवलत मिळणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना बाय बॅक गॅरंटी देखील मिळणार आहे.

इतर सवलत
इलेक्ट्रॉनिक्स विभागात अनेक वस्तूंवर सुमारे 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. यात हेडफोन्स, स्पीकर, लॅपटॉप आणि कॅमेऱ्याव्यतिरिक्त स्मार्टवॉच सारख्या वस्तूंचा समावेश आले. टीव्ही आणि अप्लायन्स कॅटेगरीत सुमारे 50 हजारहून अधिक प्रोडक्टवर 75 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल.

Visit : Policenama.com