23 जूनपासून Flipkart चा स्पेशल सेल, iPhone सोबतच ‘या’ फोन्सवरही मिळणार सूट

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   फ्लिपकार्टवर मंगळवार 23 जूनपासून बिग सेव्हिंग डेज सेलचे आयोजन केले जाणार आहे. ही विक्री 27 जूनपर्यंत सुरू राहणार असून, Vivo Z1x, Apple iPhone 8, Google Pixel 3a आणि Xiaomi Mi Mix 2 सारख्या स्मार्टफोनमध्ये सवलत देण्यात येईल. तसेच ग्राहक Vivo Nex, iPhone XS आणि Oppo A9 (2020 सारख्या फोनवरही ऑफर घेण्यास सक्षम असतील. या चार दिवसांच्या विक्री दरम्यान एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंही मिळेल. तसेच, फ्लिपकार्टकडून नो-कोस्ट- ईएमआय ऑप्शन आणि Motorola Razr (2019) यासह अनेक फोनवर अतिरिक्त एक्सचेंज सूट दिली जाईल.

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेलच्या आधी एका मायक्रोसाईटद्वारे खास डील्सचा प्रिव्हयु जारी करण्यात आला आहे. या सेलदरम्यान Vivo Z1x 16,990 रुपयांऐवजी 14,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध होणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे iPhone 7 Plus 32GB मॉडेल 36,999 रुपयांऐवजी 34,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. Google Pixel 3a सिरीज मालिका 29,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीला विकली जाईल. म्हणजेच सध्याच्या 30,999 रुपयांच्या किंमतीच्या तुलनेत 1,000 रुपयांची सूट मिळेल.

त्याचप्रमाणे फ्लिपकार्टच्या यादीनुसार ग्राहक Oppo A9 (2020) चे 4GB + 128GB व्हेरिएंट 15,990 रुपयांऐवजी 12,990 रुपयांमध्ये खरेदी करण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर Mi Mix 25,000 च्या सवलतीनंतर 19,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयात उपलब्ध होईल. तासेच या सेलमध्ये Vivo Nex 29,990 रुपयांऐवजी 23,990 रुपयांना विकले जातील.

iPhone 8 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्याच्या 38,999 रुपयांऐवजी 36,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. येथे ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचाही लाभ मिळेल. ऑप्शन डिस्काउंट नंतर iPhone 7 32GB 29,499 रुपयांऐवजी 28,499 रुपयात उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे iPhone XS 64GB मॉडेल 62,999 रुपयांऐवजी 58,999 रुपयांना विकला जाईल. Motorola Razr (2019) च्या सेल दरम्यान 25,000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज सवलत दिली जाईल. तसेच, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील महिन्याच्या सुरुवातीच्या 5,209 रुपये दराने देण्यात येईल. सध्या, फ्लिपकार्टने मेजर डील्सचेच प्रिव्हयु दिले आहे.