कामाची गोष्ट ! आता ‘या’ कंपनीकडून घ्या घरबसल्या ‘गोल्ड’ लोन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्टचे सह – संस्थापक बिन्नी बन्सल यांनी गोल्ड लोन स्टार्टअप कंपनी रूपीक फिन्टेक (Rupeek Fintech) मध्ये गुंतवणूक केली आहे. रूपीक फिन्टेक ही एक ऑनलाइन कंपनी आहे जी सोन्याचे दागिने किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूंवर कर्ज देते.

अलिकडच्या काही महिन्यांमध्ये कंपनीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनी ने GGV कॅपिटलसह इतर काही गुंतवणूकदारांकडून ६ कोटी निधी जमा केला आहे. कंपनीने एका निवेदनात जारी केले आहे की टँगलिन व्हेंचर पार्टनर (Tanglin Venture Partners), फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांच्या बीटीबी वेंचर्स (BTB Ventures) आणि कोरियाची केबी इन्व्हेस्टमेंट कंपनी (KB Investment Co) कडून निधी उभारला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, बंगळुरूमध्ये या स्टार्टअपचे मूल्यांकन 30 कोटी डॉलर्स आहे. तथापि, रूपीक ने आपल्या वतीने या मूल्यांकनाचा खुलासा केलेला नाही.

एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रूपीकमार्फत कर्ज घेणार्‍या ग्राहकांना घर बसल्या कर्ज मिळते. कंपनी घरी जाऊन एक मूल्यांकन करते आणि कर्जाचे वितरण करते. सप्टेंबर 2019 मध्ये कंपनीने 1.60 कोटी डॉलर्सचे कर्ज वितरित केले होते. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मणियार यांनी सांगितले की कंपनी आता दरमहा 2.80 कोटी डॉलर्सचे कर्ज देते. मणियार म्हणाले, सोन्याचे कर्ज घेणाऱ्या नव्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. आम्ही भारतीयांना संधी देत आहोत की त्यांनी आपले कौटुंबिक दागिने एखाद्या सोनाराकडे तारण न ठेवता चांगल्या पद्धतीने आमच्याकडे तारण ठेवावेत आणि पैसे मिळवावेत.

10 शहरांमध्ये पसरला आहे व्यवसाय
रूपीकचे कामकाज सध्या 10 शहरांमध्ये पसरलेले आहे. एका आकडेवारीनुसार, भारताच्या घराघरात सुमारे 25,000 टन म्हणजेच 1 लाख कोटी डॉलर्स इतके सोने पडलेले आहे. या स्टार्टअप ची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. त्यानंतर सिलिकॉन व्हॅलीची व्हेंचर कॅपिटल फर्म सेक्वाया कॅपिटल आणि एक्सेलकडून निधी प्राप्त झाला.