Flipkart चे सहसंस्थापक सचिन बन्सल यांच्याावर पत्नीनं हुंडयासाठी छळ केल्याचा लावला आरोप, FIR दाखल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांच्यावर त्यांच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावला आहे. सचिन बंसल यांच्या पत्नी प्रियाने बंगळुरुच्या कोरमंगला पोलीस स्टेशनमध्ये हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआरआयमध्ये चार लोकांचे नाव आहे. ज्यात सचिन बंसल, त्यांचे वडील सतप्रकाश अग्रवाल, आई किरण बंसल आणि भाऊ नितीन बंसल यांच्या नावाचा समावेश आहे.

2008 मध्ये झाला होता विवाह –
सचिन आणि प्रिया यांचा विवाह 2008 साली झाला होता. आपल्या तक्रारीत प्रियाने आरोप लावले आहे की विवाहानंतर सचिन आणि त्यांच्या कुटूंबीयानी हुंडा मागण्यास सुरुवात केली होती. 28 फेब्रुवारीला पोलिसांना दिलेल्या तक्रारीत प्रिया यांनी आरोप केला आहे की त्यांच्या वडीलांनी त्यांच्या लग्नात 50 लाख रुपये खर्च केले होते आणि सचिन यांना 11 लाख रुपये रोख दिले होते. असे असले तरी न्यायालयाच्या रेकॉर्डनुसार सचिन बंसल यांच्या आईने आपल्या सुनेच्या विरोधात काही आठवड्यापूर्वी गुन्हा दाखल केला होता परंतु त्याचे कारण कोणालाही माहित नाही.

बहिणीचे केले होते लैंगिक शोषण – प्रिया
सचिन यांनी पत्नी पेशाने डेंटिस्ट आहे, तिने आरोप लावला आहे की सचिनने तिला मारहाण केली आणि तिच्याकडून पैशांची मागणी केली. तसेच हे देखील सांगितले की त्यांची जितकी स्थावर मालमत्ता दोघां मिळून आहे ती सचिनच्या नावे करावी. त्यांनी असा ही आरोप सचिन जेव्हा दिल्लीला गेले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या बहीणीचे लैंगिक शोषण केले.

प्रियाने आरोप केला आहे की जेव्हा सचिनला प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यास नकार दिला तेव्हा सचिनने त्यांच्या आई वडीलांना आणि भावाला त्रास देण्यास सुरुवात केली.

सचिन बंसलच्या जामीनावर आज होणार निर्णय –
प्रियाने सचिन बंसल यांच्या विरोधात कलम 498 ए (हुंड्यासाठी छळ) आणि हुंडाबंदी कायदा कलम 3 आणि 4 नुसार एक एफआयआर दाखल केली आहे. सचिन बंसनने 29 फेब्रुवारीला जामीनासाठी अर्ज केला होता आणि आज गुरुवारी त्यांच्या याचिकेवर निर्णय होणार आहे.