Flipkart Alcohol Delivery : फ्लिपकार्ट सुद्धा करणार दारूची होम डिलिव्हरी, ‘या’ राज्यांमधून होणार सुरूवात

नवी दिल्ली : अमेझॉननंतर आता दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट सुद्धा दारूची होम डिलिव्हरी करणार आहे. यासाठी तिने एका स्टार्टअपशी करार केला आहे. ज्यामध्ये दारू बनवणारी प्रमुख कंपनी Diageoची भागीदारी आहे. सुरूवातील दोन भारतीय राज्यात अल्कोहोलची डिलिव्हरी केली जाईल. ज्यामध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिसाचा सहभाग आहे.

आयडब्ल्यूएसआर ड्रिंक्स मार्केट अनालिसिसनुसार, भारतात अल्कोहोल बाजार 27.2 अरब डॉलर असल्याने फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला यामध्ये खुप फायदा दिसत आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या सरकारने म्हटले आहे की, फ्लिपकार्ट दियाजीओच्या अल्कोहोल होम डिलिव्हरी मोबाइल अ‍ॅप हिपबारसोबत टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जोडली जाऊ शकते.

पत्रानुसार, फ्लिपकार्टच्या ग्राहकांना को ई-कॉमर्स प्लॅटफार्मवर हिपबरच्या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल. यातील एका सूत्राने सांगितले की, या व्यवस्थेत फ्लिपकार्टच्या ग्राहकांना आपल्या पसंतीची दारू ऑर्डर करण्याची परवानगी असेल, जी हिपबार रिटेल आऊटलेटवरून कलेक्ट केल्यानंतर डिलिव्हर केली जाईल.

हिपबारमध्ये दियाजीओ इंडियाची 26 टक्के भागीदारी आहे. मात्र, याबाबत फ्लिपकार्टकडून कोणतेही उत्तर सध्या मिळालेले नाही. महत्वाचे म्हणजे जूनमध्ये वृत्त होते की, अमेझॉनने पश्चिम बंगालमध्ये दारूची डिलिव्हरी करण्यासाठी क्लियरन्स घेतले आहे. याशिवाय स्विगी आणि झोमॅटोने काही शहरात दारूची डिलिव्हरी सुरू केली आहे. कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी लोक घरातून कमी प्रमाणात बाहेर पडत आहेत, ज्यामुळे दारूच्या होम डिलिव्हरीची मागणी वाढत आहे.