Flipkart ची नवी सुविधा, तुम्हाला शॉपिंग करताना Type करावे लागणार नाही तर…

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) ने युजर्ससाठी नवी सुविधा आणली आहे. त्यानुसार, युजर्सना त्यांच्या गरजेचे सामान खरेदी करण्यासाठी आता सर्च करावे लागणार नाही किंवा त्यासाठी टाईपही करावे लागणार नाही. फक्त तुम्हाला ते बोलावे लागणार आहे. त्यानंतर ते सामान आणि त्याची किंमत मोबाईलवर दिसणार आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे.

Flipkart ने व्हाईस सर्चचा पर्याय दिला आहे. त्यानंतर आता ग्राहकांना त्यांच्या गरजेचे सामान शोधण्यासाठी जो वेळ लागणार आहे, त्याची बचत होणार आहे. सध्या याचा फायदा फक्त Android युजर्स घेऊ शकणार आहेत. फ्लिपकार्ट या फिचरला Amazon च्या एलेक्सा पॉवर व्हाईस सर्च (Amazon’s Alexa-powered voice search) टक्कर देण्याच्या दृष्टीने सुरु करत आहे. Amazon ने गेल्या वर्षी मार्च महिन्यात 2020 मध्ये अँड्राईड युजर्ससाठी हा पर्याय लाँच केला होता. सध्या फ्लिपकार्टकडून हिंदी आणि इंग्रजी भाषेत व्हाईस सर्च खरेदीचा पर्याय मिळू शकतो.

असे करेल फिचर काम

फ्लिपकार्टचा ग्राहक Android युजर्स असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा ऍप सुरु कराल, तेव्हा तुम्हाला मायक्रोफोनचे आयकॉन दिसणार आहे. जर तुम्हीही प्रोडक्ट घेऊ इच्छिता तर तुम्हाला फक्त बोलालया हवे. काही क्षणांत सामान तुमच्या समोर येईल आणि ते तुम्ही बुक करू शकता.