Mobile Bonanza Sale : 48 MP कॅमेर्‍यांचा Vivo Z1x फक्त 1940 रूपयांमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्ट मोबाईल बोनान्झा सेलची सुरूवात झाली आहे. 17 फेब्रुवारीपासून 21 फेब्रुवारीच्या दरम्यान चालणार्‍या या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, स्मार्टफोन्स आणि लॅपटॉपवर मोठे डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. या सेलमध्ये अनेक प्रीमियम, मिड आणि बजट रेंजच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. सेलमध्ये Xiaomi, Realme, Vivo, Oppo, Apple सह अनेक ब्रँडचे स्मार्टफोन्स डिस्काउंट आणि बँक ऑफरसह खरेदी करता येऊ शकतात. विवोचा मागच्या वर्षी लॉन्च झालेला स्मार्टफोन Vivo Z1x ला सुद्धा या सेलमध्ये डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

या स्मार्टफोनवर 4,000 च्या अतिरिक्त डिस्काउंटची ऑफर दिली जात आहे. फोन तीन स्टोरेज ऑप्शन्स 6GB RAM + 64GB, 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 128GB मध्ये उपलब्ध आहे. याचे बेस मॉडल (6GB RAM + 64GB) 15,990 रूपयात खरेदी करू शकता. याचे 6GB RAM + 128GB मॉडल 16,990 रूपयात खरेदी करता येईल. तर, 8GB RAM + 128GB मॉडल 17,990 रूपयात खेरीदा करता येईल. अ‍ॅक्स्सि बँकेच्या क्रेडिट किवा डेबिट कार्ड यूजर्सना 10 टक्के इंस्टन्ट डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड यूजर्सना 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. फोनसोबत नो – कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरसुद्धा दिली जात आहे. प्रत्येक वेरियंटच्या खरेदीवर यूजर्सना 14,050रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली आजे.

या स्मार्टफोनमध्ये 6.38 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 712 आयएई प्रोसेसर आहे. याच्या पाठीमागे रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला प्रायमरी सेंसर 48 मेगापिक्सल दिला गेला आहे. 8 मेगापिक्सल आणि2 मेगापिक्सलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. 32 मेगापिक्लचा सेल्फी कॅमेरा आहे. यात 4,500 एमएएचची बॅटरी आहे.