फ्लिपकार्टची 90 मिनिटांची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरू, पुण्यासह ‘या’ 6 शहरांत मिळेल सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   फ्लिपकार्टने घोषणा केली होती की लवकरच सुपरफास्ट सर्व्हिस सुरू करणार आहे. ज्यामध्ये केवळ 90 मिनिटात प्रॉडक्ट घरापर्यंत डिलिव्हर केले जाईल. अखेर फ्लिपकार्ट आपली ही सुपर फास्ट डिलिव्हरी सेवा सुरू करत आहे. सध्या ही सुविधा दिल्ली, गुरूग्राम, गाझियाबाद, नोएडा, हैद्राबाद आणि पुणेसाठी सुरू करण्यात आली आहे.

कस्टमर्स कोविड 19 मध्ये आवश्यक सामान जसे फ्रेश फ्रूट्स, भाज्या, डेअरी प्रॉडक्ट, ग्रोसरी, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्ससह बेबी केयर प्रॉडक्ट्स आता केवळ तासाभरात घरी मागवू शकतात. पुढील टप्पयात कंपनी ही सुविधा आणखी दोन मेट्रो शहरात सुरू करण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये मुंबई आणि कोलकाताचा समावेश आहे.

बेंगळुरूहून सुरू केली सर्व्हिस

फ्लिपकार्टने आपली क्विक डिलिव्हरी सर्वप्रथम 2020 मध्ये बेंगळुरूमध्ये लाँच केली होती, जिथे अनेक प्रॉडक्टस कमी वेळात ग्राहकांपर्यंत डिलिव्हर केले होते. कंपनीनुसार, फ्लिपकार्ट क्विकसाठी त्यांनी निंजाकार्टमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांच्या सोबत लोकल वेंडर्ससोबत पार्टनरशिप केली ज्यातून ग्राहकांपर्यंत कमीत कमी वेळात आवश्यक आणि ताजे सामान पोहचवता येईल. ज्यामध्ये आमच्या लॉजिस्टिक पार्टनर महत्वाची भूमिका निभावली आहे.

स्थानिक पदार्थांचा सुद्धा अस्वाद घेऊ शकता

कंपनी म्हणणे आहे की, आपल्या हायपर लोकल सर्व्हिसच्या आश्वासनानुसार फ्लिपकार्टची क्विक सर्व्हिस लोकांना ही सुविधी देईल की, ते बाजाराच्या किंमतीत स्थानिक पदार्थांचा सुद्धा स्वाद घेऊ शकतील. यासाठी फ्लिपकार्टने रत्नागिरी अल्फांजो आंबे सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर विकण्यास सुरूवात केली आहे. या क्विक सर्व्हिसमध्ये लोकांना पहिली डिलिव्हरी मोफत मिळेल. परंतु यासाठी किमान ऑर्डर 499 रुपयांची असणे आवश्यक आहे. यासोबतच कस्टमर्सला हे सुद्धा ऑपशन मिळेल, ज्यामध्ये ते ऑर्डर केव्हा हवी उदहारणार्थ सकाळी 6 वाजतापासून अध्या रात्रीपर्यंत, त्यांना जेव्हा हवे तेव्हा सामान डिलिव्हर होईल.