खुशखबर ! आता ‘फ्लिपकार्ट’वर पहा ‘एकदम’ फ्री ‘चित्रपट’, ‘व्हिडीओ’ आणि ‘वेबसीरिज’

बंगळुरु : वृत्तसंस्था – फ्लिपकार्ट कंपनी सध्या देशातील ऑनलाईन विक्रीसाठीची अग्रेसर कंपनी आहे. फ्लिपकार्टच ग्राहकही अधिक आहेत. त्यात फ्लिपकार्ट ग्राहकांच्या संख्ये अजून वाढ करण्यासाठी मोफत व्हिडिओ सेवा सुरु करण्याचे ठरवे आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्टच्या ग्राहकांना फ्लिपकार्टवर चित्रपट, व्हिडिओ, आणि वेबसिरीज फ्रीमध्ये पाहता येणार आहेत.

लोकांना कोणत्याही साईटवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर खेळवून ठेवण्यासाठी व्हीडिओद्वारे केलेले मनोरंजन कधीही सोयीस्कर ठरते. त्यामुळे फ्लिपकार्टने हा निर्णय घेचल्याची माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने दिली आहे.

फ्लिपकार्टच्या हा निर्णय छोट्या शहरातील गावातील लोकांना आकर्षित करण्यासाठी घेण्यात आला आहे. फ्लिपकार्ट्च्या या निर्णयाने देशातील १६ कोटी लोकांना याचा फायदा घेता येणार आहे. तसंच शॉपिंगमध्ये फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन हे आपापसाद प्रतिस्पर्धी असल्याने व्हीडिओवरून दोघांमध्ये स्पर्धा होऊ शकते. कारण अ‍ॅमेझॉन प्राईमवरू व्हीडिओ पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत तर फ्लिपकार्टची व्हीडिओ सेवा निशुल्क असणार आहे. या सेवे अंतर्गत ग्राहकांनी चित्रपट, शॉर्ट व्हीडिओ आणि महत्त्वाचे म्हणजे वेब सीरिज पाहता येणार आहेत.

ज्या ग्राहकांकडे फ्लिपकार्टचा अ‍ॅप आहे, अशा ग्राहकांनाच याचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे फ्लिपकार्टचे व्हीडिओ लॅपटॉपवर पाहता येणार नाहीत, अशीही माहिती कंपनीने दिली आहे. तसंच हा मुद्दा ग्राहकांना पचनी पडणार नाही, परंतू मोबाईल अ‍ॅपच्या ग्राहकांमध्ये नक्कीच वाढ होईल.

दरम्यान, व्हीडिओसाठी येणारा ओरिजनल कंटेट कोठून आणि कोणाकडून येईल हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. तसंच या सेवेची चाचणी काही मोजक्या ग्राहकांसोबत करण्यात येत आहे. तसंच पुढच्या २०-२५ दिवसांत या सेवेचा लाभ सर्व ग्राहकांना घेता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like