Flipkart TV Days Sale : Smart TV वर मिळत आहे 65 टक्के डिस्काउंट, खरेदीची आहे योग्य संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   E-Commerce वेबसाइट Flipkart ने 9 जानेवारीपर्यंत TV Days Sale चे आयोजन केले आहे. या दरम्यान अनेक कंपन्यांच्या लोकप्रिय ब्रँडवर मोठी सूट मिळत आहे. ही सूट 65 टक्के आहे. अशावेळी ग्राहकांना संधी आहे की, ते या सवलतीचा लाभ घेत 32 इंचापासून मोठ्यात मोठ्या साइजचा टीव्ही कमी किंमतीत खरेदी करू शकतात.

Samsung 32 इंच स्मार्ट टीव्ही

Samsung चा 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा आहे तर तो केवळ 15,999 रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीची ओरिजनल किंमत 20,999 रुपये आहे. सोबतच तो 11,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसोबत खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये Disney + Hotstar, Hotstar, Netflix आणि YouTube सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

iFFALCON TCL चा 55 इंच टीव्ही

या टीव्हीवर 59 टक्केचा ऑफ दिला जात आहे. या टीव्हीची किंमत Flipkart वर 1,26,990 रुपये आहे, डिस्काउंटनंतर यांची किंमत 51,999 रुपये होईल. यासोबतच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्केचा अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. सोबतच प्रीपेड ट्रांजेक्शन्सवर 1,000 रुपयांचा ऑफ दिला जात आहे.

Motorola 4K 75 इंच स्मार्ट टीव्ही

Motorola 4K 75 इंचाचा स्मार्ट टीव्ही Flipkart TV Days Sale मध्ये 1,19,999 रुपयात उपलब्ध होत आहे. या टीव्हीवर 54 टक्के डिस्काउंट दिले जात आहे. याची ओरिजनल किंमत 2,61,900 रुपये आणि तो एक्सचेंज ऑफरमध्ये सुद्धा खरेदी करता येईल. यामध्ये अँड्राइड ओएस सपोर्ट दिला आहे आणि हा 60Hz रिफ्रेश रेटसोबत येतो.

Nokia 55 इंच अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही

नोकियाचा 55 इंच अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही 28 टक्के डिस्काउंटसह 42,999 रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के पर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. सोबतच एक्सचेंज ऑफरची सुद्धा सुविधा आहे. यामध्ये खास फीचर म्हणून इनबिल्ट क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टंट सपोर्ट दिला आहे.

Philips 58 inch Smart TV

हा टीव्ही 1,19,990 रुपयांच्या किंमतीत लिस्टेड आहे. यावर 62 टक्केचा ऑफ दिला जात आहे. डिस्काउंटच्या नंतर टीव्ही 44,999 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय 3,991 रुपयांपर्यंत अतिरिक्त ऑफ सुद्धा दिला जात आहे.