Floating ATM | तलावात तरंगणारे अनोखे ATM, ग्राहकांसाठी SBI ने सुरू केलेली विशेष सेवा बनली आकर्षणाचे केंद्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था| भारतीय स्टेट बँकेने (SBI) श्रीनगरच्या स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी डल सरोवरात (Dal Lake) एका हाऊस बोटवर तरंगणारे एटीएम (Floating ATM) उघडले आहे. या तरंगणार्‍या एटीएमचे उद्घाटन एसबीआयचे चेयरमन दिनेश खरे यांनी केले. हे तरंगणारे एटीएम आता स्थानिक लोकांसह पर्यटकांची रोख रक्कमेची गरज पूर्ण करेल. सोबतच हे त्यांच्या आकर्षणाचे केंद्र सुद्धा बनले आहे, अशी माहिती एसबीआयने ट्विट करून दिली आहे.

एसबीआयने काय म्हटले?

एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बँकेने स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी श्रीनगरच्या डल सरोवरात एका हाऊस बोटीवर एटीएम उघडले. ज्याचे उद्घाटन एसबीआयच्या अध्यक्षांनी 16 ऑगस्टला केले. ते लोकप्रिय डल सरोवरात लोकांची गरज पूर्ण करणार आहे.

केरळात सुद्धा आहे फ्लोटिंग एटीएम

यापूर्वी State Bank of India ने 2004 मध्ये केरळमध्ये फ्लोटिंग एटीएमची सुरुवात केली होती. हे फ्लोटिंग एटीएम केरळ शिपिंग अँड इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशन (KSINC) च्या ‘Jhankar yacht’ वर उघडले होते.

 

Web Title : Floating ATM | sbi opened floating atm at dal lake inaugurated on 16th august 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kirit Somaiya | खा. भावना गवळींना केला 100 कोटींचा घोटाळा, मुख्यमंत्री आणि पोलीस ‘प्रोटेक्ट’ करतात; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Pune Crime | पुण्याच्या स्वारगेट परिसरातील उच्चभ्रू कुटुंबातील सुनेवर कौटुंबिक अत्याचार; प्रीतम हसमुख जैन यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Phone Tapping Report | रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग अहवालाचे मुख्य पत्र तपास यंत्रणेला देण्याबाबत विचार करू – राज्य सरकार