मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट ! 7.15 % व्याज देणारी स्कीम लॉन्च, वाटेल तेवढी करा गुंतवणूक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कमी होत असलेल्या व्याजदरामध्ये आजपासून भारत सरकार फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्ड आणत आहे. त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ७.१५ टक्के व्याज दिले जाईल. या व्यतिरिक्त दर सहा महिन्यांनी हे व्याज गुंतवणूकदाराच्या बँक खात्यावर पाठवले जाईल. अशा परिस्थितीत जे लोक व्याजाच्या विश्वासावर आपला खर्च चालवत आहेत, त्यांच्यासाठी देखील चांगली संधी आहे. भारत सरकारचा बाँड असल्याने गुंतवणूक केलेल्या पैशांच्या सुरक्षेची संपूर्ण हमी आणि चांगले व्याज मिळण्याची संधी आहे. कोणताही भारतीय नागरिक हा बॉण्ड खरेदी करू शकतो. सध्या एसबीआय मध्ये ६% च्या आसपास व्याज मिळत आहे. अशा परिस्थितीत त्याहूनही जास्त व्याज मिळण्याची आजपासून संधी आहे.

किमान किती गुंतवणूक करावी लागेल?
देशात राहणारा कोणताही नागरिक आणि एसयूएफ त्यात गुंतवणूक करु शकतो. मात्र एनआरआय हा बॉण्ड खरेदी करू शकत नाहीत. या बाँडमध्ये ७ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि किमान १००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. मात्र १००० रुपयांच्या एकाधिक गुंतवणूकीत कितीही गुंतवणूक केली जाऊ शकते. पण गुंतवणूकदारांनी हा बॉण्ड रोखमध्ये विकत घेतला, तर जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा २० हजार रुपये असेल.

फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्डवर किती मिळेल व्याज ?
सध्या भारत सरकारने फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्डवर ७.१५% देण्याचे ठरवले आहे. पण हा फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड आहे, म्हणजेच दर ६ महिन्यांनी त्यांचे व्याज बदलू शकते. १ जानेवारी आणि १ जुलै रोजी या व्याजदराचा आढावा घेतल्यानंतर सरकार त्याची अंमलबजावणी करेल. फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्डचे व्याज प्रत्यक्षात प्रचलित राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी व्याज दराशी जोडले जाईल. म्हणजे हे व्याज नेहमी एनएससी दरापेक्षा ३५ बेस पॉईंट जास्त असेल. आता १ जानेवारी २०२१ रोजी एनएससीच्या व्याज दरानुसार बॉण्डवर पुन्हा बदल केले जातील.

दर ६ महिन्याला दिले जाईल व्याज
फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्डचे व्याज दर ६ महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या बँक खात्यावर पाठवले जाईल. हे व्याज प्रत्येक वर्षाच्या १ जानेवारी आणि १ जुलै रोजी दिले जाईल. पण या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्डवर मिळालेल्या व्याजावर लोकांना कर भरावा लागेल. या बॉण्डवरील मिळणाऱ्या व्याजातून होणार्‍या उत्पन्नावरील नियमांनुसार आयकर भरावा लागेल. म्हणजेच या व्याजासह आपली एकूण कमाई करपात्र असेल तर त्यावर कर भरावा लागेल, अन्यथा कर भरावा लागणार नाही. या बॉण्डच्या व्याजावर टीडीएसला लागेल, पण पात्र गुंतवणूकदारांकडे १५जी/ एच जमा करण्याचा पर्याय असेल.

फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्ड कसा खरेदी करायचा ?
फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड कोणत्याही सरकारी बँकेतून खरेदी करता येईल. याशिवाय आयडीबीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकमधून देखील खरेदी करता येईल. हे बॉण्ड केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिले जातील. हा बॉण्ड खरेदी करताच हे गुंतवणूकदाराच्या बॉण्ड लेझर खात्यात ट्रान्सफर केले जातील.

किती दिवसानंतर याला विकले जाऊ शकते?
फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्डचा दुय्यम बाजारात व्यवहार केला जाऊ शकत नाही. म्हणूनच त्यांना परिपक्वतेच्या वेळीच कॅश केले जाऊ शकते. मात्र ज्येष्ठ नागरिकांची आवश्यकता लक्षात घेता, नियम उदारपणे ठेवले गेले आहेत. परिपक्ववता होण्यापूर्वीच ज्येष्ठ नागरिक फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्डमधून पैसे काढू शकतात.