×
Homeताज्या बातम्याFloating Solar Panel Project | '... तर भागवत कराड यांनी एकतरी कागद...

Floating Solar Panel Project | ‘… तर भागवत कराड यांनी एकतरी कागद दाखवावा’, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचे खुले आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जायकवाडी (Jayakwadi) येथे फ्लोटिंग सोलर प्रकल्प (Floating Solar Panel Project) उभा राहावा यासाठी मी प्रयत्न केले. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पावर विचार करण्यात आला नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फ्लोटिंग सोलर प्रकल्पावर (Floating Solar Panel Project) विचार करता येणार नाही, असे मला पत्राद्वारे सांगितले होते, असा दावा भाजप नेते (BJP Leader) तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी केला आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी कराड यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या प्रकल्पासाठी मी नकार दिला, असे कराड म्हणत असतील तर त्यांनी याबाबतचा एकतरी कागद दाखवावा, असं खुलं आव्हान पाटील यांनी कराड यांना दिले.

 

जयंत पाटील म्हणाले, मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिला नाही. भागवत कराड यांनी खोटं बोलणं बंद करावे. औरंगाबादच्या जनतेला प्रभावित करण्यासाठी त्यांचा हा उद्योग सुरु आहे, असे पाटील म्हणाले.

 

फ्लोटिंग सोलर पॅनल प्रोजेक्टबाबत (Floating Solar Panel Project) कराड यांनी फक्त पत्र लिहिले होते. त्यामुळे सरकार फक्त पत्रावर चालत नाही. खरंतर केंद्राच्या एनटीपीसी विभागाकडून (NTPC Division) याबाबतचा प्रस्ताव यायला हवा होता. परंतु भागवत कराड यांनी राज्य सरकारला (State Government) पत्र दिले होते. केंद्रीय मंत्री असल्यामुळे आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेतली व एक समिती गठीत केली.
एप्रिलच्या शेवटी पत्र आले आणि जूनच्या सुरुवातीला आम्ही याबाबत समिती गठीत केली. त्यामुळे प्रकल्प घालवला हे सांगणे चुकीचे आहे.
मी नकार दिला आहे, असे ते म्हणत असतील तर त्यांनी एकतरी कागद दाखवा, असे पाटील म्हणाले.

आम्ही जे करायचे ते ‘करेक्ट’ करतो
भागवत कराड यांना भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election-2024) उभे राहण्यास सांगितले आहे.
त्यांना राज्यसभेतून तिकीट दिले जाणार नाही. याच कारणामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.
निवडणूक लढवायची असेल तर लढवावी, पण खोटं बोलू नये. माझ्या दृष्टीने त्यांना मी जास्त महत्त्व देत नाही.
आम्ही नाचत नाही. आम्ही जे काही करायचे असते ते ‘करेक्ट’ करतो.
त्यांना आता काही जमत नसेल म्हणून लोकांना प्रभावित करण्यासाठी ते अशी विधाने करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

 

Web Title :- Floating Solar Panel Project | aurangabad floating solar panel project jayant patil rejects all allegations made by bhagwat karad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Ravi Rana | ‘जर कोणी दम देत असेल तर त्याला…’, रवी राणांच्या वक्तव्यावरुन राणा-कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटणार

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

Abdul Sattar | ‘माझ्या मतदारसंघात दोन नंबरचे पप्पू…’, अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला

Must Read
Related News