थरार ! काश्मीरमध्ये पूरात अडकलेल्यांना जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीनं वाचवलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सारख्या ठिकाणी महापुराने काही दिवसांपूर्वी चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ केरळ आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा जोरदार पूरपरिस्थिती तयारी झाली होती. जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु होता.

जम्मूमधील काही भागात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे नद्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. सर्वच ठिकाणी मदतीसाठीचे कार्य सुरु आहे. जम्मूतील तावी नदीवर अडकलेल्या दोन नागरिकांना सैन्य दलाने सुखरूप वाचवल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

नदीला भरधाव वेगाने पाणी सुरु आहे आणि नदीच्या बाजूला अडकलेल्या दोन जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक पद्धतीने उचलून हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं आहे. यामुळे दोन जणांचे प्राण वाचले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like