‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’च्या परिसरात पुराचे पाणी शिरले ; तापी, नर्मदा धोक्याच्या पातळीवर

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदूरबार जिल्ह्यात रात्रीपासून संततधार पाऊस पडत असून रंगावली नदीला पुन्हा मोठा पूर आला. शहादा शहर जलमय झाले असून गोमाई, तापी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशात पडलेल्या मुसळधार पावसाने नर्मदा नदीला पूर आला आहे. नर्मदा नदीवरील सरदार सरोवराची पातळी १३१ मीटरच्या वर गेली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच गेट उघडण्यात आली असून त्यातून विसर्ग सुुरु झाला आहे. त्यामुळे स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या परिसरात पूराचे पाणी शिरले आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वेगाने पुढे सरकले असून ते मध्य प्रदेशवर कालपासून स्थिरावले आहे. त्यामुळे पश्चिम मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम नर्मदा नदीला पूर आला आहे. त्याचबरोबर गोमाई, तापी नद्यांना पूर आले आहेत.

धुळे, नंदूरबार, अमरावती येथे जोरदार पाऊस पडत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानुर धरणाचे चारही दरवाजे सकाळी ८ वाजता ३० सेंटीमीटरने उचलण्यात आले. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नवापूर शहरातील रंगावली नदीला पुन्हा मोठा पूर आला असून रात्री मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यात वरील भागातील डांग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. रंगावली नदी लगत असलेल्या बोकळझर, वासरवेल, चौकी, वडकळंबी, गावात पाणी, आदिवासी दिनाचा दिवशी आदिवासी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

स्टॅच्यु ऑफ युनिटी च्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या गॅलरीमध्ये जूनमध्ये झालेल्या जोरदार पावसाने पाणी भरल होतं. जूनच्या अखेरीस वादळी वाऱ्यांसह वेडावाकड्या पावसाने संपूर्ण गॅलरी पाण्याने भरुन गेली होती. आता धरणातून पाणी सोडल्याने पुतळ्याचा परिसर जलमय झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –