‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींना सिनेमात मिळेना काम तरीही आहेत ‘कोट्याधीश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांना सिनेमात मोजक्याच भूमिका मिळाल्या आहेत. या भूमिकांमुळे हे कलाकार खास करून अभिनेत्री लोकांच्या लक्षातही आहे. जरी या अभिनेत्री लोकांच्या स्मरणात राहिल्या आहेत तरी त्यांच्या करिअरला मात्र पाहिजे तितके यश मिळाले नाही असे दिसत आहे. परंतु या अभिनेत्रींची संपत्ती जर पाहिली तर कोटींच्या घरात आहे असे तु्म्हाला दिसेल. शिवाय या अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

आमिषा पटेल

Amisha-patel

कहो ना प्यार है हा सिनेमा २००० साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. आमिषा पटेलने या सिनेमातून प्रेक्षकांना चक्क वेड लावले. हा आमिषाचा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमाने आमिषाला वेगळी ओळख दिली. अभिनेता ऋतिक रोशनही या सिनेमाने रातोरात स्टार झाला. या सिनेमानंतर आमिषाला गदर एक प्रेमकथा हा दुसरा सिनेमा मिळाला.

या सिनेमात आमिषाने चुलबुली शकीनाचा रोल साकारला होता. हा सिनेमाही सुपरडुपर हिट ठरला. आमिषाने साकारलेल्या भूमिकेने तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. दोन सिनेमात प्रसिद्धी मिळवणारी आमिषा यानंतर कोणत्या सिनेमातच काय तर जाहिरातीतही दिसली नाही. परंतु तिची संपत्ती ऐकली तर तुम्ही चकित व्हाल. आमिषाची संपत्ती ३५ दशलक्ष डॉलरहून अधिक आहे.

अमृता राव

amruta-rao

अभिनेत्री अमृता रावने अनेक सिनेमात मोजक्याच भूमिका साकारल्या आहेत. अमृताने मोजके सिनेमे केले असले तरी तिची लोकप्रियता खूप आहे. मोजक्याच परंतु लक्षात राहणाऱ्या भूमिका अमृताने साकारल्या आहेत. अमृताला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळालेले नाही. महत्त्वाचे म्हणजे अमृताने दाक्षिणात्य सिनेमातही काम केले आहे. अमृताची जवळपास २० दशलक्ष डॉलरहून अधिक संपत्ती आहे.

मल्लिका शेरावत

Mallika-Sherawat

अभिनेत्री मल्लिका शेरावतने सिनेमात हॉट आणि बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. परंतु काही सिनेमात काम केल्यानंतर मल्लिकाला बॉलिवूडमधून आता कोणत्याही ऑफर मिळत नाही असे दिसत आहे. तुम्हाला माहिती नसेल परंतु श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे. मल्लिकाला बॉलिवूडमधून जरी ऑफर येत नसल्या तरी काही हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये तिने काम केले आहे. मल्लिकाची एकूण संपत्ती ६७ कोटींहून अधिक आहे.

 

पहलू खान लिंचिंग प्रकरण : कॉंग्रेस आता भाजपची कॉपी बनले आहे : ओवेसी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

कोंढवा दुर्घटनेची सखोल चौकशी करा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पाच सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे ‘वजन’ होईल कमी

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

You might also like