खुपच गाजतेय शॉर्ट फिल्म ‘चड्डी’, दाखवलं सेक्सुअल फ्रीडमचं ‘वास्तव’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री फ्लोरा सैनी हिनं चड्डी या तिच्या शॉर्ट फिल्मनं खूपच अटेंशन घेतलं. गोरील्ला शॉर्ट्सवर ही शॉर्ट फिल्म आली आहे. चड्डी ही एक अशा गृहिणीची स्टोरी आहे जी आपलं लग्न निभावताना बोर झाली आहे. यात तिला प्रेमही मिळत नाही आणि शारीरिक संबंधांचं कोणतं सुखही तिला मिळत नाही. नितेश पांडे यानं ऑफिसच्या कामानं बेजार झालेल्या पतीची भूमिका साकारली आहे.

फ्लोरानं ज्या महिलेची भूमिका साकारली आहे तिचं नाव आहे मिसेस चड्ढा. तिच्या बोर जीवनात तेव्हा राडा होतो जेव्हा तिच्या गॅलरीत एक पुरुषाची आकर्षक अंडरवियर पडते. फ्लोरानं उत्तम अभिनय करत आपली भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारली आहे. नितेशनंही तिला चांगली साथ दिली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये चांगला संदेश तर देण्यात आलाच आहे, सोबतच यात कॉमेडीही आहे.

डायरेक्टर अंबर चक्रवर्तीनं चड्डी या शॉर्ट फिल्मचं डायरेक्शन केलं आहे. अंबरनं अनेक पुरस्कार जिंकले आहेत. अलीकडे अंबर म्हणाला, “चड्डी या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अनेक सकारात्मक गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच एंटरटेंमेंटचीही काळजी घेतली गेली आहे.”