समुद्र किनार्‍यावर खेळत होता चिमुरडा, मागून आला शार्क (व्हिडिओ)

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेतील फ्लोरिडा शहर हे समुद्र किनारपट्टीसाठी ओळखले जाते. मात्र येथे मोठ्या प्रमाणात शार्क मासेही आहेत. कोको बीचचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भयंकर घटना घडली असून लहान मुलगा पाण्यात खेळत असताना अचानक त्याच्या मागून शार्क मासा आहे. सुदैवाने या मुलाला वाचवण्यात एका पोलीस अधिकार्‍याला यश आले. ही घटना एखाद्या सिनेमाप्रमाणे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पोलीस अधिकारी अ‍ॅसड्रियन कोसिकी पत्नीसमवेत समुद्र किनार्‍यावर फिरत होते, जेव्हा त्यांना पाहिले की पाण्यामध्ये काहीतरी हालचाल होत आहे. त्यांना तेवढ्याच एक शिकारी शार्क दिसला. हा शार्क किनार्‍यावर खेळत असलेल्या मुलाच्या दिशेने येत होते, तेवढच्या पोलीस अधिकार्‍याने पाण्यात उडी मारून या मुलाचे प्राण वाचवले. हा व्हिडीओ कोको बीच पोलीस आणि फायर विभागाने फेसबुकवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी अिॅ्ड्रयन पाण्यात उडी मारताना स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडा पोलीस अधिकार्‍याचा आवाजही ऐकू येत आहे. ते म्हणत आहे की, त्या बाजूला एक शार्क आहे…त्यानंतर अ‍ॅाड्रियन पाण्यात उडी मारुन मुलाला खेचून किनार्‍यावर आणले आहे. या पोलीस अधिकार्‍याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पोलीस अधिकार्‍यांनी, अ‍ॅतड्रियनचे खूप खूप आभार, शार्कचा हेतू काय होता हे आम्हाला कधीच कळणार नाही, परंतु या लहान मुलाला एक कहाणी मिळाली. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत