अनोख्या पबची आकर्षक सजावट, छताला लटकली आहे 20 लाखाची कॅश; चोरली तरी खर्च करता येणार नाही

नवी दिल्ली : सामान्यपणे पब (Pub and Restaurant) मध्ये जाऊन लोक डान्स आणि हँग आऊट करतात, परंतु जगात असाही एक पब आहे, जिथे लोक रुपये पाहण्यासाठी येतात. या पबच्या छताला इतक्या नोटा लटकलेल्या आहेत (Nearly 20 lakh in Cash Hanging from Ceiling) की त्या पाहून मनात त्या चोरण्याचा विचार आवश्य येईल.
मात्र, चोरी करून सुद्धा तुम्ही हे पैसे खर्च करू शकणार नाही.
या नोटा पूर्णपणे खर्‍या आहेत, तरीसुद्धा त्या खर्च करणे सोपे नाही.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

मॅकगुएर (McGuire) यांचा हा आयरिश पब Pub फ्लोरिडामध्ये आहे. पेन्साकोलाच्या (Pensacola, Florida) काही प्रसिद्ध रेस्टॉरंटपैकी हा एक पब आहे. येथे लोक दुरदूरहून येतात.
याचे कारण आहे येथील सर्व्हिससह येथे लटकलेल्या सुमारे 20 लाख (Two Million Dollars) खर्‍या नोटा आहे.
आगळ्या-वेगळ्या सजवटीमुळे या रेस्टॉरंटची चर्चा फ्लोरिडा आणि त्याच्या बाहेर सुद्धा होत आहे.

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

1977 पासून सुरू झाले
हे रेस्टॉरंट 1977 मध्ये मार्टिन मैकगुएर आणि त्यांची पत्नी मोली (Molly) ने सुरू केले होते.
रेस्टॉरंट बिझनेसमध्ये आल्यानंतर जेव्हा सर्वात पहिल्या कस्टमरने त्यांना टिप म्हणून 1 अमेरिकन डॉलर दिला
तेव्हा मोलीने त्यावर तारीख टाकून सही केली आणि नंतर ती नोट गुडलक म्हणून लटकवली.
लोकांनी जेव्हा पहिली टिप अशा सुंदर प्रकारे सांभाळून ठेवल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी यामध्ये आणखी नोटा ऑटोग्राफ (Note with Autograph) सह लटकवण्यास सुरू केले.
तेव्हा पासून हे कलेक्शन वाढतच गेले.

15000 स्क्वेअर फुटमध्ये दिसतात डॉलरच डॉलर
हा पब 15000 स्क्वेअर फुटमध्ये आहे. या संपूर्ण एरियाच्या छताला डॉलरच डॉलर लटकलेले दिसत आहेत. जेव्हा तिथे जागा संपली तेव्हा ते टोकन्स भिंतीला सुद्धा लटकवण्यास सुरूवात केली.
1999 मध्ये या पब Pub च्या मालकाने म्हटले की, ते या डॉलरच्या हिशेबाने टॅक्स सुद्धा देतात.
ते यास संपत्तीप्रमाणे मानतात आणि या बदल्यात लोन सुद्धा घेऊ शकतात.

केवळ सजवण्यासाठी 20 लाख कॅश
पबमध्ये सुमारे 20 लाख रुपये किंमतीचे 1 लाख 75 हजार अमेरिकन डॉलर केवळ सजावटीसाठी येथे लावले आहेत.
येथे येणार्‍या लोकांच्या मनात अनेकदा विचार येतो की, ते घरी घेऊन जावे, परंतु ते असे करू शकत नाहीत. मात्र, येथे अगोदर एकदा चोरी झाली आहे.
पबच्याच एका कर्मचार्‍याने येथून 5000 अमेरिकन डॉलर भिंतीवरूून काढले होते.
अनेक लोक यातून नोट काढून आपल्या वापरात आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे.

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

चोरणे सोपे आहे, चालवणे अवघड
येथून चोरी करून नेलेल्या नोटा मार्केटमध्ये चालवणे अवघड आहे. या नोटांवर तारीख आणि सही असते. अशावेळी काळ्या मार्करने लिहिलेल्या नोट ओळखता येतात आणि त्या बाजारात खर्च करणे अवघड होते.
त्यांच्या रेस्टॉरंटची ख्याती सर्वांना माहित आहे, यामुळे अनेकदा पोलिसांनी अशा नोटा परत आणून दिल्या आहेत.
मॅकगुएरिन यांनी या रेस्टॉरंटच्या यशानंतर फ्लोरिडाच्याच डेस्टिनमध्ये दुसरे रेस्टॉरंट उघडले, ज्यामध्ये टिपचे लाखो रूपये लटवलेले आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Florida pub is decorated with nearly 20 lakh in cash hanging from ceiling but can not be stolen

मुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट