Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Flu And Corona Fever | पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron Covid Variant) नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना ताप हा सामान्य तापापेक्षा थोडा वेगळा असतो. सध्या थंडीचा काळ असल्याने या ऋतूमध्ये सामान्य फ्लूचाही धोका वाढला (Flu And Corona Fever) आहे. यामुळे फ्लू आणि कोरोना ताप यातील फरक आणि उपाय समजून घेवूयात (The difference between the flu and corona fever And remedies)…

 

करोनाचा ताप आणि सामान्य तापातील फरक

फ्लूमध्ये 1 ते 4 दिवसात लक्षणे जाणवू शकतात तर कोरोना व्हायरसची लक्षणे 1 ते 14 दिवसांच्या दरम्यान विकसित होऊ शकतात.

कोरोनाचा इन्क्यूबेशन कालावधी 5.1 दिवस तर फ्लूमध्ये इनक्यूबेशन कालावधी म्हणजे लक्षणे विकसित झालेल्या दिवसांची संख्या 1 ते 3 दिवसांची असते.

कोरोना रुग्णाला 100.4 °F (38 °C) किंवा त्याहून अधिक ताप असू शकतो.

सामान्य तापात कोरोनासारखी वास आणि चव कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येत नाहीत

बहुतेक रुग्ण साधारण तापातून दोन आठवड्यात बरे होतात.

कोरोनामुळे रुग्णाच्या नसा, फुफ्फुस, हृदय, पाय किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा मुलांना मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem Inflammatory Syndrome) होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होणे व धाप लागणे ही कोरोनाची एक सामान्य समस्या आहे, परंतु फ्लूच्या बाबतीत असे काहीही होत नाही. (Flu And Corona Fever)

कोरोनाच्या रूग्णांना तापासह डोकेदुखी (Headache) असेलच असे नाही, पण हे फ्लूचे सर्वात मोठे लक्षण आहे.

खूप थकवा किंवा मळमळ कोरोनामध्ये जास्त असते तर साधारण फ्लूमध्ये ते कमी असते.

1. आराम करा (Take Proper Rest)
ताप आल्यावर विश्रांती घ्या. पुरेशी झोप घ्या. यामुळे इम्युनिटी वाढते. जास्त त्रास असेल तर डॉक्टरांना संपर्क करा.

 

2. द्रव पदार्थ जास्त घ्या (Drink More of fluids)
तापात डिहायड्रेशन (dehydration) ची समस्या टाळण्यासाठी भरपूर द्रव प्या. यासाठी पाणी, चहा, नारळपाणी, सूप, ज्यूस इत्यादींचे सेवन करावे.

 

3 हलके कपडे घाला (Wear Light Clothing)
ताप कमी करण्यासाठी हलके-फुलके कपडे घाला. खूप गरम कपडे घालू नका.

 

4. थंड पाण्याचा शेक घ्या (Shake With Cold Water)
एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात स्वच्छ व मऊ सुती कापड भिजवून रुग्णाच्या कपाळावर, मनगटावर आणि घशावर लावा. उर्वरित शरीर झाकून ठेवा. ताप 103 अंशांपेक्षा जास्त असेल तर गरम पाण्याने शेकवणे टाळा.

 

5. कोमट पाण्याने अंघोळ करा (Take Warm Bath)
शरीर थंड होण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.

6. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा (Add Salt To Lukewarm Water)
1 ग्लास कोमट पाण्यात 1/4 टीस्पून मीठ आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा मिसळून गुळण्या करा. यामुळे घसा खवखवणे कमी होते. घशातील बॅक्टेरिया देखील पडू शकतात.

 

7. डोक्याखाली 2 उशा घ्या (Take 2 Pillows Under Head)
सर्दीचा त्रास असेल तर डोके मऊ उशीवर उंचावर ठेवा. पण जास्त वेळ उंच उशीवर झोपणे टाळा.

 

8. संक्रमनाशी लढणारे पदार्थ खा (Eat foods That Fight Infection)
तापात संसर्गाशी लढण्यास मदत करणारे पदार्थ केळी, तांदूळ, व्हिटॅमिन सी असलेले ब्लूबेरी, गाजर, काळीमिरी, क्रॅनबेरी, ब्लॅक अँड ग्रीन टी इत्यादी सेवन करा.

 

 

Web Title :- Flu And Corona Fever | try these 8 home remedies to protect against the corona fever and general fever and boost your immunity AS

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus Restrictions In Maharashtra | … तर वॉईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

Protect Against Omicron Covid Variant | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून बचाव करायचा असेल तर WHO ची गाईडलाईन आवश्य करा फॉलो, तेव्हाच राहाल सुरक्षित

Girish Mahajan | गिरीश महाजन ‘गोत्यात’? पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दाखल; जाणून घ्या प्रकरण