36 तासात कोट्यवधी लोकांचा जीव घेऊ शकते ‘ही’ महामारी, आरोग्य तज्ज्ञांनी दिला सतर्कतेचा ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरोग्य तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा देत माहिती दिली आहे की जगभरात एक फ्लू (तापाचा प्रकार) वेगाने पसरत आहे. जो 36 तासात 80 कोटी लोकांना बाधित करत आहे. ग्लोबल प्रीपेयरडनेस मॉनिटरिंग बोर्डच्या एका रिपोर्टनुसार चेतावनी देण्यात आली आहे की जग या भयानक रोगाच्या वाढत्या धोक्याचा सामना करत आहे. जे जागतिक स्तरावर ना की फक्त लाखो लोकांचा जीव घेऊ शकते तर मोठ्या प्रमाणात गोंधळ माजवू शकते.

पॅंडेमिक रोगाच्या संबंंधित जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) माजी प्रमुख यांच्या नेतृत्वात आरोग्य विशेषज्ञांच्या एका गटाने 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू रोगराईचा इशारा दिला होता, या रोगाने जगभरातील 1/3 लोकसंख्येला बाधित केले होते. या रोगाने 50 मिलियन लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

पुढे ते म्हणाले की, रोज लोक विमाने जगभरात फिरत असतात. यामुळे फ्लू पसरण्याची शक्यता अधिक वाढते. कारण एक सारखे संसर्ग विषाणू आता दोन दिवसात जागतिक स्तरावर पसरु शकतात आणि जवळपास 5 टक्के जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्याबरोबरच जवळपास 50 मिलियन पासून 80 मिलियन लोकांचा जीव घेऊ शकतात.

विशेषज्ञांनी बुधवारी जाहीर केलेल्या ए वर्ल्ड इन रिस्क रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की जगभरात पसरणाऱ्या या रोगाचा धोका वास्तविक आहे. जागतिक बँकेच्या कार्यकारी चीफ एक्जिक्यूटिव आणि समितीच्या सद्स्या एक्सल वॅन ट्रोटसेनबर्ग यांनी सांगितले की या रोगात लाखो लोकांना मारण्याची शक्ती आहे. याने अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा येते.

काही सरकारांनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी 2014 – 2016 च्या दरम्यान इबोला सारख्या धोकादायक रोगामुळे सतर्क आणि तयार राहण्याचे प्रयत्न करत आहे. परंतू अजूनही योग्य ते यश मिळाले नाही. WHO चे माजी प्रमुख ग्रो हार्लेम ब्रुन्डलँड यांनी सांगितले की, रोग आणि आरोग्य आपात स्थितीसाठीचा दृष्टिकोन ‘भीती आणि उपेक्षाचे एक चक्र’ आहे. ज्यात आपल्याला अत्यंत सतर्क असणे आवश्यक आहे.

WHO चे महानिर्देशक, टेड्रोस अधानोम यांनी सांगितले की रोगाचा प्रकोप आपल्या खूप काही शिकवतो, याबरोबरच त्यांनी या रोगराईपासून वाचण्याच्या पद्धतीची माहिती दिली. WHO ने या वर्षाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की फ्लूची आणखी एक रोगराई जी संसर्गजन्य विषाणूमुळे होेते, यासाठी जगानेे तयार राहिले पाहिजे.

Visit – policenama.com