विना Check-in बॅग विमान प्रवास होणार स्वस्त; फक्त केबिन बॅग जा घेऊन अन् ‘इतकी’ मिळवा सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामध्ये विमानसेवाही बंद होती. मात्र, आता विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण आता विना Check-in बॅग विमान प्रवास केल्यास तुम्हाला विमानाच्या तिकीटात सवलत दिली जाणार आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, आता लवकरच विना चेक-इन बॅगसह प्रवास केल्यास तिकीटावर सवलत दिली जाणार आहे. ही सवलत देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिटासाठी असणार आहे. एक प्रवासी 7 किलोपर्यंत केबिन बॅग आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. कोरोना काळानंतर यापूर्वीही एअरलाईन्सकडून Light Fares चा पर्याय दिला गेला होता. त्यानंतर आता हा पर्याय पुन्हा दिला जाणार आहे. पूर्वेत्तर राज्यात या देशांतर्गत विमान प्रवासासाठी 200 रुपयांपर्यंत सवलत दिली जात होती. जर कोणताही प्रवासी या पर्यायाचा वापर करून तिकीट घेईल तर त्याला चेक इन-बॅगसह विमानतळावर आला तर त्याला 15 किलोंपर्यंत बॅगसाठी 200 रुपये वेगळे द्यावे लागत होते.

दरम्यान, देशांतर्गत प्रवासासाठी प्रवाशांना 7 किलोंचे केबिन बॅग आणि 21 किलोंचे लगेज बॅग (Check-In Bag) नेण्याची परवानगी असते. त्यासाठी प्रवाशांना त्याचे भाडे द्यावे लागते.

सात फेअर बँड आणि सर्वांसाठी वेगवेगळे भाडे
कोरोना व्हायरसनंतर देशांतर्गत विमान वाहतूक सुरु झाली. तेव्हापासून प्रवासासाठी लागणाऱ्या कालावधीचे सात कॅटगरीमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक कॅटेगरीसाठी किमान आणि कमाल भाडे निश्चित केले होते. उड्डाण वाहतूक मंत्रालयाने यामध्ये किमान प्रवासासाठी 10 टक्के आणि कमाल भाड्यासाठी 30 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जुन्या नियमानुसार, दिल्ली-मुंबई या मार्गासाठी 3500 रुपये आणि कमाल भाड्यासाठी 10 हजार रुपये दिले होते. आता हे 3900 रुपये आणि 13000 रुपये झाले आहेत.