Flying Bike Video | स्वप्न नाही सत्य, ही आहे जगातील पहिली उडणारी बाईक, टॉप स्पीड- 100 kph

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Flying Bike Video | फ्लाईंग बाईक्स चित्रपटांमध्ये अनेकदा दिसतात. पण, एका स्टार्टअप कंपनीने खरोखरच हे केले आहे. जपानी स्टार्टअप कंपनी AERWINS Technologies ची फ्लाईंग बाईक Xturismo ने गुरुवारी अमेरिकेत डेट्रॉईट ऑटो शोमध्ये पदार्पण केले. या हॉवरबाईकला जगातील पहिली उडणारी बाईक म्हटले जात आहे. कंपनी पुढील वर्षी अमेरिकेत तिची विक्री करण्याची तयारी करत आहे. (Flying Bike Video)

 

XTurismo ला अर्बन मोबिलिटीचे भविष्य म्हटले जात आहे. ही बाईक गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एक प्रॉडक्ट म्हणून प्रदर्शित केली होती. त्यानंतर जपानमधील फ्लाईंग डेमोमध्ये सर्वसामान्यांसाठी त्याचे अनावरण करण्यात आले.

 

 

स्पीड
वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, जपानी स्टार्टअप कंपनी AERWINS Technologies ची Xturismo hoverbike 40 मिनिटे उडू शकते आणि तिचा टॉप स्पीड 100 kmph आहे. (Flying Bike Video)

 

हॉवरबाईक आधीच जपानमध्ये विक्रीसाठी आहे आणि AERWINS चे फाऊंडर आणि CEO Shuhei Komatsu यांनी सांगितले आहे की कंपनी पुढील वर्षी अमेरिकेत तिचे छोटे व्हर्जन विकण्याची तयारी करत आहे.

किंमत
तिची किंमत 7,77,000 डॉलर (अंदाजे 6 कोटी रुपये) आहे. कंपनीचे म्हणणे आहे
की छोट्या इलेक्ट्रिक मॉडेलची किंमत 50,000 डॉलर म्हणजे सुमारे 39,82,525 रुपये असेल.
पण, यासाठी 2025 पर्यंत वेळ लागू शकतो.

 

XTurismo कावासाकी हायब्रिड इंजिनद्वारे पॉवर्ड गॅसोलीन-इलेक्ट्रिक हॉवरबाईक आहे.
यात दोन प्रायमरी प्रोपेलर आणि चार सेकंडरी प्रोपेलर असतात जे स्टेबिलायझर म्हणून काम करतात.
तिचा आवाज खूप जास्त आहे, कंपनी आवाज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
ही बाईक बहुतांश कार्बन फायबरच्या अनेक भागांपासून बनवली आहे. तिचे वजन 300 किलो आहे.

 

Web Title :- Flying Bike Video | worlds first flying bike makes its debut in us

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MoRTH | RTO च्या 58 सुविधा आता घरबसल्या मिळतील, ड्रायव्हिंग लायसन्स (DL) सारख्या सुविधांसाठी माराव्या लागणार नाहीत फेर्‍या

Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना

Jio – Airtel – Vi – BSNL | एक महिन्यापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील SIM, हे आहेत Jio, Airtel, Vi आणि BSNL चे प्लान, TRAI ने जारी केली लिस्ट